India vs Bangladesh : आता बांग्लादेशात घुसून स्ट्राइक करण्याची वेळ आली, कारण ते कामच तसं करतायत

India vs Bangladesh : बांग्लादेश अलीकडे भारतविरोधात अनेक निर्णय घेत आहे. पण आता त्यांची मजल खूप वाढली आहे. तिथे जे सुरु आहे. त्यामुळे भारताच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आता बांग्लादेशात घुसून वार करण्याची वेळ आली आहे.

India vs Bangladesh : आता बांग्लादेशात घुसून स्ट्राइक करण्याची वेळ आली, कारण ते कामच तसं करतायत
Muhammad Yunus
| Updated on: Dec 17, 2025 | 9:04 AM

बांग्लादेशात शेख हसीना सत्तेतून बेदखल झाल्यापासून तिथे पाकिस्तानचा हस्तक्षेप वाढला आहे. बांग्लादेश पाकिस्तानच्या नादाला लागून अनेक भारतविरोधी निर्णय घेत आहे. बांग्लादेशात उभं राहणारं पाकिस्तान समर्थित दहशतवादी नेटवर्क भारतासाठी एक गंभीर चिंतेचा विषय आहे. गोपनीय माहिती आणि रिपोर्ट्सनुसार बांग्लादेशच्या वेगवेगळ्या भागात पाकिस्तान आणि जमान-ए-इस्लामीच्या मदतीने 8 दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प सुरु आहेत. यात तीन कॅम्प भारतीय सीमेच्या खूप जवळ आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे कॅम्प थेट किंवा अप्रत्यक्षपणे पाकिस्तानच्या मदतीने आणि कट्टरपंथी संघटनांच्या सहकार्याने सुरु आहेत.

भारतीय सीमेजवळ सुरु असलेल्या या टेरर कॅम्पचा पहिला उद्देश भारताला नुकसान पोहोचवण हाच आहे. उद्या भारताला या दहशतवादी ट्रेनिंग कॅम्पसमुळे धोका निर्माण होणारा आहे. त्यामुळे बांग्लादेशात घुसून सर्जिकल किंवा ए्अर स्ट्राइक करण्याची वेळ आली आहे.

कुठल्या भागात सुरु आहेत टेरर कॅम्प

1 चिट्टागोंगच्या लालखान भागातील एक कॅम्प अंसार अल-इस्लाम आणि लश्कर-ए-तैयबाशी संबंधित आहे. हा कॅम्प हारुन इजहार आणि पाकिस्तानी सैन्याचा माजी मेजर जिया चालवत आहेत. हा कॅम्प भारताच्या त्रिपुरा आणि मिजोरम सीमेजवळ आहे.

2 बसिला आणि मोहम्मदपुर मदरशात संशयास्पद हालचाली दिसून आल्या आहेत. तिथून हे दहशतवादी कॅम्प कोण चालवतायत? याची माहिती अजून समोर आलेली नाही. ढाका येथील तामीर-उल-मिल्लत मदरशात इस्लामी विद्यार्थी संघटना आणि पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISI चा यामध्ये रोलमध्ये आहे.

3 चिट्टागोंग हिल ट्रॅक्ट्समध्ये जमातुल अंसार फिल हिंदालचा कॅम्प चालू आहे. या कॅम्पला शमीन महफुज सारख्या कट्टरपंथी संघटनेच समर्थन आहे. या संघटनेच केएनएफ आणि अराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मीशी (ARSA) सुद्धा संपर्क आहे. चिट्टागोंग हिल ट्रॅक्ट्स त्रिपुरा आणि म्यानमार बॉर्डरच्या जवळ आहे.

4 नदी किनारी आणखी चार ठिकाणी जमात-उल-मुजाहिदीनचे तळ आहेत. बोगरा आणि चपाइनवाबगंज पश्चिम बंगाल (मालदामुर्शिदाबाद बेल्ट) लागून असलेलं क्षेत्र आहे. ढाक्यामध्ये हिज़्ब-उत-तहरीर भर्ती कट्टरपंथी विचारधारेचा प्रसार करत आहेत.

दक्षिण आशियाच्या सुरक्षेसाठी मोठा धोका

माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा मुलगा सजीब वाजेद जॉयने या दहशतवादी कॅम्पसबद्दल चिंता व्यक्त केली आहे. बांग्लादेशात कट्टरपंथीय शक्तींना मोकळीक मिळाली आहे आणि पाकिस्तान समर्थित दहशतवादी नेटवर्क हातपाय पसरत आहे असा आरोप त्यांनी केला. जॉय यांच्यानुसार ही स्थिती फक्त बांग्लादेशसाठी नाही, तर संपूर्ण भारत आणि दक्षिण आशियाच्या सुरक्षेसाठी मोठा धोका आहे.