AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL : BCCI ची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी या धुरंधर खेळाडूचा संघात समावेश

IND vs SL : भारत विरूद्ध श्रीलंका कसोटी मालिकेसाठी जखमी साई सुदर्शनच्या जागी बदली खेळाडूची घोषणा करण्यात आली आहे. भारताचा अपडेटेड संघ जाणून घेऊयात.

IND vs SL : BCCI ची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी या धुरंधर खेळाडूचा संघात समावेश
IND vs SL Sai Sudarshan ReplacementImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 09, 2026 | 8:57 PM
Share

भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेला 15 ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. या मालिकेसाठी जखमी साई सुदर्शनच्या जागी बदली खेळाडूची घोषणा करण्यात आली आहे. BCCI साई सुदर्शनच्या जागी सरफराज खानचा संघात समावेश केला आहे. दुखापतीमुळे साई सुदर्शन टीम इंडियातून बाहेर पडला होता. सध्या तो बंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये दुखापतीतून सावरण्यासाठी उपचार घेत आहे.

BCCI ने आज सोशल मीडिया पोस्टद्वारे साई सुदर्शनच्या जागी बदली खेळाडूची घोषणा केली आहे. BCCI ने म्हटले की, ‘साई सुदर्शन श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. तो बंगळुरू येथील BCCI सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये दुखापतीतून सावतर आहे. उजव्या पायाच्या अंगठ्याला झालेल्या दुखापतीतून तो बरा होत असून त्याची रिकव्हरी चांगली सुरू आहे. BCCI ची वैद्यकीय टीम त्याच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. आता निवड समितीने श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी साई सुदर्शनच्या जागी सरफराज खानचा संघात समावेश केला आहे. 15 ऑगस्ट 2026 पासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ गालेकडे रवाना होण्यापूर्वी सरफराज कोलंबो येथे संघात सामील होईल.’

प्रदीर्घ काळानंतर टीम इंडियात पुनरागमन

सरफराज खानला बराच काळानंतर टीम इंडियामध्ये संधी मिळाली आहे. त्याने आपला शेवटचा कसोटी सामना नोव्हेंबर 2024 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला होता. सरफराजने आतापर्यंत 6 कसोटी सामन्यांतील 11 डावांमध्ये 37 च्या सरासरीने 371 धावा केल्या आहेत. मात्र, सरफराज खानला भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणे सध्या कठीण दिसत आहे. देवदत्त पडिक्कल चांगल्या फॉर्ममध्ये असून त्याने सराव सामन्यात शतक झळकावले आहे. त्यामुळे तो नंबर 3 वर फलंदाजी करताना पहायला मिळू शकतो.

कसोटी सामन्यांचे वेळापत्रक

भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेला 15 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना 15 ते 19 ऑगस्टदरम्यान गाले येथे खेळवला जाणार आहे. त्यानंतर दुसरा कसोटी सामना 23 ते 27 ऑगस्टदरम्यान कोलंबो येथे खेळला जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला आवश्यक गुण मिळवणे महत्त्वाचे असल्याने ही मालिका टीम इंडियासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र, भारतीय संघातील प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे बाहेर पडल्याने कर्णधार शुभमन गिलची चिंता वाढली आहे. याआधी जसप्रीत बुमराह, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा हे खेळाडू संघाबाहेर पडलेले आहेत.

भारताचा अपडेटेड संघ

शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर बरार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन, आकिब नबी आणि सरफराज खान.

Follow Us
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी