AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Elon Musk : इलॉन मस्क यांची मोठी घोषणा, ट्रम्प यांच्या ट्विटर अकाउंटवरली बंदी हटवली जाईल, तो चुकीचा निर्णय होता, कंपनीच्या निर्णयालाच ठरवलं चूक

गेल्या वर्षी सहा जानेवारीला अमेरिकन संसद भवनात बळजबरीने घुसखोरी झाल्याच्या घटनेनंतर ट्विटरने ट्रम्प यांचं खातं कायमचं बंद केलं होतं.

Elon Musk : इलॉन मस्क यांची मोठी घोषणा, ट्रम्प यांच्या ट्विटर अकाउंटवरली बंदी हटवली जाईल, तो चुकीचा निर्णय होता, कंपनीच्या निर्णयालाच ठरवलं चूक
Image Credit source: Facebook
| Updated on: May 11, 2022 | 10:33 AM
Share

मुंबई :  टेस्लाचे सीईओ एलोन मस्क (Elon Musk) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या ट्विटर (twitter) अकाउंटवरून बंदी हटवण्याचा निर्णय दिला आहे. त्याचबरोबर हा नैतिकदृष्ट्या चुकीचा निर्णय असल्याचंही त्यांनी सांगितलंय. मस्क यांनी सोशल मीडिया कंपनीच्या या निर्णयाला ‘अत्यंत मूर्ख’ म्हटले आहे. ट्विटरद्वारे खात्यावर कायमस्वरूपी बंदी घालणे ही क्वचित प्रसंगी असायला हवी आणि ज्या खात्यांमध्ये अडथळे येतात त्यांच्यासाठी अशी पावले उचलली जावीत, असे ते म्हणाले. इलॉन मस्क, जे ट्विटरच्या अधिग्रहण योजनेची अंमलबजावणी करत आहेत. त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कारच्या भविष्यावरील परिषदेला संबोधित करताना हे सांगितलंय.

खातं कायमचं बंद केलं होतं

गेल्या वर्षी सहा जानेवारीला अमेरिकन संसद भवनात बळजबरीने घुसखोरी झाल्याच्या घटनेनंतर ट्विटरने ट्रम्प यांचं खातं कायमचं बंद केलं होतं. 6 जानेवारी 2021 रोजी कॅपिटल कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या हिंसाचारानंतर केवळ ट्विटरच नाही तर फेसबुक आणि यूट्यूबने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे खातेही निलंबित केलं होतं.

हिंसाचारानंतर बंदी

6 जानेवारी 2021 रोजी ट्रम्प समर्थकांनी यूएस काँग्रेसला अध्यक्षीय निवडणुकीत जो बिडेन यांच्या विजयानंतर कॅपिटॉल कंपाऊंडमध्ये हिंसक हल्ला केला होता. याबाबत फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबने भीती व्यक्त केली होती. समर्थकांना हिंसाचारासाठी आणखी भडकावू शकतो. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर कायमची बंदी घालण्यात आली होती.

कंपनीचा निर्णय ‘अत्यंत मूर्ख’

एलोन मस्क यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर अकाउंटवरून बंदी हटवण्याचा निर्णय दिला आहे. त्याचबरोबर हा नैतिकदृष्ट्या चुकीचा निर्णय असल्याचंही त्यांनी सांगितलंय. मस्क यांनी सोशल मीडिया कंपनीच्या या निर्णयाला ‘अत्यंत मूर्ख’ म्हटले आहे. ट्विटरद्वारे खात्यावर कायमस्वरूपी बंदी घालणे ही क्वचित प्रसंगी असायला हवी आणि ज्या खात्यांमध्ये अडथळे येतात त्यांच्यासाठी अशी पावले उचलली जावीत, असे ते म्हणाले.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.