Coal Crisis: भारताचा कोळसा उत्पादनात उच्चांक; एप्रिलमध्ये 29% वाढ! मग वीज तुटवड्याचा बागुलबुवा का?

भारताने कोळसा उत्पादनात उच्चांक स्थापित केला आहे. वर्षाधारित उत्पादनात एप्रिल महिन्यांत 29 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. एवढेच नव्हे तर कोळशावर आधारीत वीज उत्पादनात एप्रिल 2022 मध्ये वाढ झाली आहे. मग अनेक राज्यांनी वीज तुटवड्याचा बागुलबुवा का उभा केला की खरंच कोळश्याचे नियोजन न झाल्याने वीज संकट राज्यांवर ओढावले होते हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

Coal Crisis: भारताचा कोळसा उत्पादनात उच्चांक; एप्रिलमध्ये 29% वाढ! मग वीज तुटवड्याचा बागुलबुवा का?
कोळशाबाबतची मोठी बातमीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 11, 2022 | 9:58 AM

भारताने कोळसा उत्पादनात उच्चांक स्थापित केला आहे. वर्षाधारित उत्पादनात एप्रिल महिन्यांत 29 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. यंदा एप्रिल महिन्यात 66.58 दशलक्ष टन कोळसा उत्पादन (Coal Production) करण्यात आले. गेल्या वर्षी याच महिन्यात 51.62 दशलक्ष टन उत्पादन घेण्यात आले होते. सरकारने याविषयीची आकडेवारी प्रसिद्ध केल्यानंतर ही बाब समोर आली. एप्रिल 2022 मध्ये कोल इंडिया लिमिटेड (Coal India Limited) , सिंगरेनी कोलिरीज् कंपनी लिमिटेड (Singareni Collieries Company Ltd), कॅपटिव्ह माईन्स आणि इतर नोंदणीकृत कोळसा उत्पादकांनी अनुक्रमे 27.64 टक्के, 9.59 आणि 59.98 टक्क्यांचे उत्पादन झाले. यात कोल इंडिया लिमिटेडने 53.47 दशलक्ष टन, सिंगरेनी कोलिरीज् कंपनी लिमिटेड 5.32 दशलक्ष टन तर कॅपटीव्ह माईन आणि इतरांनी 7.79 दशलक्ष टन कोळशाचे उत्पादन झाले. कोळसा मंत्रालयाने याविषयीची सांख्यिकी माहिती जाहीर केली आहे. कंपन्यांच्या कोळसा पुरवठ्यातही वाढ झाली आहे.

या एप्रिल महिन्यात 8.66 टक्क्यांच्या वाढीसह 71.30 दशलक्ष टन कोळसा पाठविण्यात आला. एप्रिल 2020 मध्ये कंपन्यांनी 65.62 दशलक्ष टन कोळशाचाा पुरवठा केला होता. यामध्ये कोल इंडिया लिमिटेडचा वाटा 6.01 टक्के म्हणजे 57.30 दशलक्ष टन , सिंगरेनी कोलिरीज् कंपनी लिमिटेडचा हिस्सा 5.53 टक्के म्हणजे 5.74 दशलक्ष टन तर कॅपटिव्ह आणि इतर खाणीमधून 35.69 टक्के म्हणजे 8.06 दशलक्ष टन कोळश्याचा पुरवठा करण्यात आला. मग अनेक राज्यांनी वीज तुटवड्याचा बागुलबुवा का उभा केला की खरंच कोळश्याचे नियोजन न झाल्याने वीज संकट राज्यांवर ओढावले होते हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

22 खाणींची उत्तम कामगिरी

देशातील सर्वात मोठ्या 37 खाणींपैकी 22 खाणींचे कोळसा उत्पादन दमदार राहिले आहे. या 22 खाणींनी 100 टक्के कामगिरी बजावली. तर इतर 10 खाणींनी उत्पादनात 80 ते 100 टक्के कामगिरी केली. एवढेच नाही तर एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार ऊर्जा उत्पादन संचाला पाठविलेल्या कोळशातही वाढ झाली आहे. यंदा पाठवलेल्या कोळशात 18.15 टक्क्यांची वाढ झाली असून 61.81 दशलक्ष टन कोळसा ऊर्जा उत्पादन संचांना पाठविण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

एप्रिल 2020 मध्ये 52.32 दशलक्ष टन कोळसा पाठविण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कोळशाच्या किंमती सर्वोच्च पातळीवर असल्यातरी आयात कोळशाच्या किंमतीही उतरल्याचे गेल्या ऑक्टोबरपासून केलेल्या निरीक्षणातून समोर आले आहे. कोळसा मंत्रालयाने याविषयीची माहिती दिली आहे.

कोणाचा दावा मानू खरा

देशात कोळसा पुरवठा होत नसल्याने ऊर्जा संकटाचे सावट पसरले होते. कोळशाच्या तुटवड्यामुळे वीज उत्पादन युनिट बंद पडतील अशी ओरड देशभर झाली होती. अनेक राज्यांच्या ऊर्जा मंत्र्यांनी याविषयीची चिंता व्यक्त केली होती. परंतू आता करण्यात येत असलेल्या दाव्यानुसार, कोळसाआधारीत ऊर्जा उत्पादनात गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यापेक्षा 9.26 टक्क्यांची वाढ झाली आहे, तर मार्च 2022 शी तुलना करता 2.25 टक्क्यांची वाढ झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ :

Non Stop LIVE Update
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.