
Donald Trump Tariffs : भारत आणि अमेरिका यांच्यात सध्या तणावाची स्थिती आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफमुळे सध्या या दोन्ही देशांत व्यापारविषयक संबंध खराब झालेले आहेत. ट्रम्प यांनी लादलेल्या याच टॅरिफमुळे अमेरिकेत सरळ-सरळ दोन गट पडले आहेत. तिथल्या काही नागरिकांनी ट्रम्प यांच्या नीतीला समर्थन दिले आहे. तर काही लोकांनी ट्रम्प यांचा उघड विरोध केला आहे. आता याच टॅरिफ वादात अब्जाधीश एलॉन मस्क यांनीही थेट उडी घेतली आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफचे समर्थन करणाऱ्या पीटर नवारो यांना मस्क यांनी चांगलंच सुनावलं आहे.
पीटर नवारो हे डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी तसेच व्यवसायविषयक सल्लागार आहेत. एलॉन मस्क आता याच पीटर यांना थेट भिडले आहेत. काही दिवसांपूर्वी नवारो यांनी भारताविषयी गरळ ओकणारे ट्वीट केले होते. त्यांचे हे ट्विट किती तथ्यहीन आहे, याची माहिती ट्विटरने कम्यूनिटी नोट्सच्या माध्यमातून दिली होती. त्यानंतर मस्क यांनी आपल्या मालकीच्या एक्स या समाजमाध्यमावरील माहिती खरी असल्याचा दावा करताना नवारो यांच्यावर टीका केली आहे.
On this platform, the people decide the narrative.
You hear all sides of an argument.
Community Notes corrects everyone, no exceptions. Notes data & code is public source.
Grok provides further fact-checking.
— Elon Musk (@elonmusk) September 7, 2025
पीटर नवारो गेल्या अनेक दिवसांपासून भारतावर टीका कर आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणाला त्यांचा पाठिंबा आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी एक्सवर एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये भारत रशियाकडून कच्च्या तेलाची आयात करतो. हाच पैसा रशिया युक्रेनविरोधातील युद्धात वापरतो, असा दावा नवारो यांनी केला होता. एक्सच्या कम्युनिटी नोटने नवारो यांच्या या पोस्टमधील दावे फॅक्ट चेकच्या माध्यमातून चुकीचे असल्याचे सांगितले. उर्जा सुरक्षेच्या दृष्टीने भारत
रशियाकडून तेल खरेदी करतो. भारताचा हा व्यापार फक्त नफ्याला समोर ठेवून नाही. भारत हा व्यापार करत असताना कोणत्याही अंतरराष्ट्रीय बंधनांचे उल्लंघन करत नाही, असे एक्सच्या कम्युनिटी नोटने सांगितले. तसेच अमेरिकादेखील रशियाकडून युरेनियम आणि अन्य खनिजांची खऱेदी करतो. अमेरिकेची ही दुतोंडी भूमिका आहे, असे एक्सच्या कम्युनिटी नोटने म्हटले.
🧵 Should X put up posts like one below where foreign interests masquerade as objective observers and interfere with domestic U.S. economics and politics? See SCREEN SHOT! Take poll on next post. pic.twitter.com/xb1wakeWFV
— Peter Navarro (@RealPNavarro) September 8, 2025
एक्स्या याच फॅक्ट चेकमुळे नवारो चांगलेच भडकले. त्यांनी एक्सच्या कम्युनिटी नोटला कचरा म्हणत हिणवले. तसेच एलॉन मस्क हे विदेशी प्रचार करत आहेत, असा दावा केला. त्यांचा हाच दावा फेटाळून लावत एलॉन मस्क यांनीदेखील नवारो यांना चांगलेच सुनावले. एक्स हा प्लॅटपॉर्म रियल टाईम, पारदर्शी, फॅक्ट चेक स्त्रोत आहे. आजकाल लोक कोणती गोष्ट नरेटिव्ह आहे हे स्वत:च ओळखतात. एक्स या मंचावर प्रत्येक पक्षाची बाजू समोर येते, असे म्हणत नवारो यांना सुनावलं.
दरम्यान, भारतावर लागू केलेल्या टॅरिफविषयी अमेरिकेतच मत-मतांतरं असल्याने आता पुढे नेमकं काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.