Elon Musk : भारताचा खरा बॉस काय…एलॉन मस्कच्या एका ट्वीटने मोठी खळबळ, चार ओळींत भारतावर गंभीर आरोप!

एलॉन मस्क यांनी एक्स सोशल मीडियावर एक 8 ऑक्टोबर रोजी एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी उद्योगपती अंबानी यांचे नाव घेत गंभीर स्वरुपाचे आरोप घेतले आहेत.

Elon Musk : भारताचा खरा बॉस काय...एलॉन मस्कच्या एका ट्वीटने मोठी खळबळ, चार ओळींत भारतावर गंभीर आरोप!
elon musk
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 08, 2026 | 9:07 PM

Elon Musk Tweet : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी ख्याती असलेल्या एलॉन मस्क सध्या भारतात वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी भारतातील अनेक दिग्गज उद्योजकांना लक्ष्य केलंय. भारतातील काही ‘ऑलिगार्क्स’ (Oligarchs) म्हणजेच काही प्रभावशाली व्यक्ती भारतात स्टारलिंकची सॅटेलाईट कम्यूनिकेशन सर्व्हिस सुरू होऊ देत नाहीयेत. ही सुविधा सुरू होण्यात अडथळा निर्माण केला जातोय, असा दावा केलाय. त्यानंतर आता मस्क यांच्या या भूमिकेनंतर जगभरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मस्क यांच्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ट्वीटचा आधार घेत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीदेखील सरकारला घेरलंय.

एलॉन मस्क यांच्या ट्वीटमध्ये नेमकं काय?

एलॉन मस्क यांनी एक्स सोशल मीडियावर एक 8 ऑक्टोबर रोजी एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी उद्योगपती अंबानी यांचे नाव घेत गंभीर स्वरुपाचे आरोप घेतले आहेत. आमच्या स्टारलिंक या कंपनीला जवळपास 165 देशांत परवाना मिळालेला आहे. भारतात सर्व परवाने मिळावेत तसेच भारत सरकारच्या प्रत्येक नियमाचे तसेच कायद्याचे पालन करण्यासाठी आम्ही जवळपास पाच वर्षे घालवली आहेत. तरीदेखील आम्हाला रपवाना का दिला जात नाहीये? असा सवाल एलॉन मस्क यांनी केलाय. सोबतच अंबानी हे भारताचे खरे बॉस आहेत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

Loading...

राहुल गांधींनही साधला निशाणा

मस्क यांच्या याच ट्वीटनंतर सगळीकडे खळबळ उडाली आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मस्क यांच्या ट्विटला रिट्वीट करत अप्रत्यक्षपणे सरकारवर निशाणा साधलाय. एलॉन मस्क तुमचे भारतात स्वागत आहे. परंतु सध्या अन्य चांगली व्यक्ती सापडेपर्यंत तुम्ही प्रतीक्षा करा, असे राहुल गांधी म्हणाले आहेत.

दरम्यान, एलॉन मस्क सोशल मीडियावर आरोप केल्यावर वेगवेगळ्या चर्चेला तोंड फुटले आहे. मस्क यांनी हे ट्वीट का केले? असे विचारले जातेय. सोबतच राहुल गांधी यांनीही मस्क यांच्या ट्वीटचा आधार घेत सरकारवर निशाणा साधल्याने त्याचे राजकीय पडसाद उमटू शकतात. सत्ताधारी याला आता कसे उत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us