
संपूर्ण जगच नफा-तोट्यावर सुरू आहे. पण जपानमध्ये रेल्वेने असं काही केलं आहे की, ते सर्व देशांसाठी प्रेरणादायी उदाहरण आहे. जपानमधील होक्काइदो बेटावर क्यू शिराताकी स्टेशन आहे. या स्टेशनची गोष्ट एकदम प्रेरणादायी आहे. ही कथा तुम्हाला ही भावनिक करेल. वर्ष 2016 पर्यंत या स्टेशनवर केवळ एकच विद्यार्थिनी रेल्वेत बसायची. तिचे शिक्षण थांबू नये यासाठी हे रेल्वे आणि स्टेशन बंद करण्यात आलं नाही. कारण त्या विद्यार्थिनीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी रेल्वे हेच एकमेव चांगलं साधनं होतं.
एका वृत्तानुसार, या भागात रहिवाशांकडे कार आणि इतर दळणवळणाची साधनं आली होती. काही मध्यमवर्गीयांना मात्र रेल्वेशिवाय पर्याय नव्हता. पण त्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकी होती. तर मालवाहक रेल्वेच्या फेऱ्याही घटल्या होत्या. त्यामुळे क्यू शिराताकी स्टेशन सुनसान झालं होतं. पण या भागातील मुलींना शिक्षणासाठी हाच एकमेव जलद पर्याय असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांना कळाले. मग त्यांनी हे स्टेशन बंद करण्याचा निर्णय पुढे ढकलला. पुढे या स्टेशनवरून एकच मुलगी काना हराडा ही शिक्षणासाठी शहरात जात होती. तिच्यासाठी ही रेल्वे लाईफलाईन ठरली होती. तिच्या एकटीसाठी रेल्वे येथे थांबत होती.
या एका मुलीसाठी हे स्टेशन सुरू होते. येथे एका मुलीसाठीच रेल्वे थांबत होती. या स्टेशनवर कानासाठी दिवसातून दोनदाच रेल्वे थांबत होती. काना शाळेत जाताना आणि ती शाळेतून परत आली तेव्हाच रेल्वे येथे थांबत होती. जर हे रेल्वे स्टेशन बंद केले असते तर काना हिला 70 मिनिटं चालून दुसऱ्या रेल्वे स्टेशनवरून तिच्या शाळेसाठी रेल्वेचा प्रवास करावा लागला असता, ही बाब अधिकाऱ्यांना माहिती होती. या रेल्वे स्टेशनवरून चार रेल्वे ये-जा करत होत्या. त्यातील दोनच तिच्या नियोजीत वेळेत धावत होत्या.
काना हिला या दोन रेल्वेचाच आधार होता. त्यामुळे तिला इतर कोणत्याही स्पर्धेत अथवा सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होता येत नव्हते. शाळा सुटताच तिला धावत स्टेशन गाठावं लागत असे, कारण तिच्यासाठी ही रेल्वे काही सेकंद अधिक थांबत असे. पण तिच्या शिक्षणासाठी हे स्टेशन सर्वात विश्वासू साधन ठरलं होतं.
मार्च 2016 मध्ये काना जेव्हा पदवीधर झाली. तिचे शैक्षणिक वर्ष संपलं. तेव्हा क्यू-शिराताकी स्टेशन हे कायमचे बंद झाले. त्यावेळी जगभरात जपानच्या रेल्वे प्रशासनाचे आणि क्यू शिराताकी स्टेशनवरील रेल्वे कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या कौतुकाच्या बातम्या प्रसारीत झाल्या. जपानच्या रेल्वे खात्याने हे दाखवून दिले की सरकारी यंत्रणा या लोकांच्या कल्याणासाठीच असतात, त्यांना त्रास देण्यासाठी नसतात.