
इथिओपियातील हेले गुब्बी ज्वालामुखीचा मोठा उद्रेक झाला आहे. या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे राखेचे मोठे ढग निर्माण झाले आहे. या राखेच्या मोठ्या ढगांमुळे देशातील विमान वाहतुकीवर परिणाम झाला आहे. या ज्वालामुखीची राख मध्य पूर्व आणि मध्य आशिया ओलांडून सध्या भारताच्या पश्चिम भागाकडे सरकत आहेत. यामुळे अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. या घटनेनंतर निसर्गाचा कोप किती भयानक असू शकतो असे बोललं जात आहे. या घटनेनंतर साधारण १९४६ वर्षांपूर्वी इटलीच्या माउंट वेसुवियसमध्ये झालेल्या विनाशकारी उद्रेकाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
आफ्रिकेतील इथियोपियामधील हेली गुब्बी ज्वालामुखी तब्बल १२ हजार वर्षांनी अचानक उसळला. या ज्वालामुखीमधून बाहेर पडलेल्या राखेचे मोठे ढग तयार झाले. हे ढग गुजरात, राजस्थान ओलांडून दिल्लीच्या आकाशापर्यंत पोहोचले आहे. यामुळे देशभरात अनेक विमानांची उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. तसेच काही विमानांचे मार्ग बदलावे लागले आहेत. इथियोपियामध्ये झालेल्या या स्फोटामुळे १९४६ वर्षांपूर्वी इटलीच्या माउंट वेसुवियसमध्ये झालेल्या ज्वालामुखी उद्रेकाची आठवण ताजी झाली आहे.
७९ ईसवी मध्ये, इटलीच्या कॅम्पेनिया (Campania) प्रदेशातील वेसुवियस पर्वतावर झालेला उद्रेक हा रोमन साम्राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती मानली जाते. वेसुवियसच्या उद्रेकापूर्वी, ६२ ईसवी मध्ये नेपल्सच्या खाडीजवळ एक मोठा भूकंप झाला होता, ज्याने पोम्पेई शहराला हादरवून सोडले होते. यात अनेक इमारतींचे नुकसान झाले होते. या ठिकाणी ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या चार दिवस आधी २४ ऑगस्ट ७९ ईसवी देखील लहान-सहान भूकंप येत होते. मात्र, त्या भागातील रहिवाशांनी याकडे एक सामान्य घटना म्हणून दुर्लक्ष केले.
यानंतर २४ ऑगस्टलाच दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ज्वालामुखीचा प्रचंड मोठा स्फोट झाला. यातून ३३ किलोमीटर उंचीपर्यंत राख, दगड, माती बाहेर फेकली गेली. सुरुवातीला पोम्पेई शहरावर राख आणि प्युमिसचा पाऊस पडला. यामुळे घरे गाडली गेली. त्यामुळे पळून जाण्याचे रस्ते बंद झाले. रात्रीच्या वेळी ही परिस्थिती अजूनच वाईट झाली. ज्वालामुखीच्या शिखरावरून अति-गरम राख आणि विषारी वायू १०० किलोमीटर प्रति तास वेगाने पसरू लागला. या प्रवाहाचे तापमान ७००°C पर्यंत होते. या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे पोम्पेई शहराच्या लोकांना स्वत:च्या बचावाची संधीही मिळाली नाही. या प्रचंड उष्णतेमुळे काही क्षणातच त्यांचा सापळा झाला.
पायरोक्लास्टिक फ्लोच्या थरांखाली पोम्पेई आणि हर्क्युलेनियम ही शहरे पूर्णपणे गाडली गेली. यावेळी साधारण १० ते १५ हजार लोकांचा मृत्यू झाला. हजारो वर्षांनी उत्खननादरम्यान याची माहिती समोर आली होती. त्यावेळी पुरातत्वशास्त्रज्ञांना काही मृतदेह, त्यांच्या वस्तू आणि घरातील भांडी, बेकरीतील भाकरीसुद्धा जशाच्या तसे अवस्थेत असल्याचे सापडले होते. माउंट वेसुवियसच्या या स्फोटात १०,००० ते १६,००० लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. या घटनेमुळे निसर्गाच्या शक्तीपुढे कोणाचे काहीही चालत नाही, याची अनुभव आपल्याला पाहायला मिळतो.