AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत रशियाला ज्याची धाकधूक तीच मोठी घोषणा, अखेर लागली वाट, थेट युरोपियन युनियननेच..

Russian Oil Ban : रशियाच्या तेलावरील निर्बंधांबाबत मोठी अपडेट येत आहे. मात्र, यानंतर भारताचे टेन्शन वाढल्याचे बघायला मिळतंय. या परिस्थितीतून मार्ग काढला जात असतानाच पुन्हा एकदा धक्कादायक निर्णय घेतला जात आहे. रशियालाही मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे.

भारत रशियाला ज्याची धाकधूक तीच मोठी घोषणा, अखेर लागली वाट, थेट युरोपियन युनियननेच..
European Union Trade Commissioner Maros Sefcovic
| Updated on: Apr 25, 2026 | 11:28 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. मात्र, नुकताच रशियाला धक्का देणारी बातमी पुढे येत आहे. या युद्धादरम्यान रशिया आणि इराण यांच्या तेलावरील निर्बंध हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. ही निर्बंधे फक्त काही दिवसांकरिता हटवण्यात आली. युद्धात होर्मुज खाडी ठप्प असल्याने जगातील अनेक देश संकटात आहेत. त्यामुळेच यांच्या तेलावरील निर्बंध हटवण्यात आले. यादरम्यानच युरोपियन युनियनचे (EU) व्यापार आयुक्त मारोस सेफकोविक यांनी रशियाला धक्का दिला. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, अमेरिका भविष्यात रशियावर लादलेले तेल निर्बंध कोणत्याही परिस्थितीमध्ये शिथिलता देणार नाही. धक्कादायक म्हणजे हे विधान त्यांनी अशावेळी केले, ज्यावेळी अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांच्यावर त्यांची उच्चस्तरीय बैठक झाली.

इराण आणि अमेरिका युद्धात रशियाच्या तेलावरील निर्बंध हटवण्यात आले. त्याला मुदतवाढ देखील देण्यात आली.  सेफकोविक म्हणाले की, अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांच्यासोबत झालेल्या चर्चेत त्यांना सांगण्यात आले की, ही सवलत फक्त काही देशांकरिता देण्यात आली. कारण तेलाचा मोठा तुटवडा निर्माण झाला. कठीण परिस्थितीमध्ये लढण्याकरिता ही एक मदत होती.

यानंतर आता भारतात थेटपणे याचे परिणाम दिसू शकतात. भारत हा रशियाकडून सर्वाधिक तेल आयात करतो. या वाईट काळात भारताच्या मदतीला रशिया धावून आला. रशियाने मोठी मदत भारताला केली. 16 मे पर्यंत रशियाकडून तेल खरेदीची मुभा आहे. भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी 30 ते 35 टक्के तेल रशियाकडून आयात करतो. पुन्हा रशियाच्या तेलावर निर्बंध घातली तर भारत संकटात येईल.

अमेरिका आणि इराण युद्ध थांबल्यानंतरही होर्मुज खाडी सुरक्षित करण्याकरिता काही महिन्यांच्या कालावधी लागणार आहे. यामुळे भारतापुढे मोठी चिंता आहे. भारताला आता इतर पर्यायांचा विचार करावा लागू शकतो. आफ्रिका, व्हेनेझुएला किंवा थेट अमेरिकेकडून तेलाची आयात वाढवणे. मात्र, रशिया भारताला त्यांच्या तेल खरेदीवर मोठी सूट देतो. जर भारताने इतर देशांकडून तेल खरेदी वाढवली तर भारतासाठी ते अधिक तोड्याचे ठरणार आहे. भारत सध्याच्या घडीला प्रत्येक गोष्टीवर विचार करत आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल