AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचा चीनला इतिहासातील सर्वात मोठा दणका, थेट वाढली चिंता, हिंद महासागरावर..

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षात होर्मुज खाडीत तणाव आहे. होर्मुज खाडी हा अत्यंत महत्वाचा मार्ग आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने कच्चे तेल आणि एलपीजीचे मोठे संकट आहे. त्यामध्येच भारताने मास्टर गेम खेळला, ज्याने चीनचा तणाव वाढला.

भारताचा चीनला इतिहासातील सर्वात मोठा दणका, थेट वाढली चिंता, हिंद महासागरावर..
Xi Jinping
| Updated on: Apr 25, 2026 | 9:47 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धात जग होरपळत आहे. युद्धात तणाव कमी व्हायचा तर तो अधिक चिघळत आहे. इराणने स्पष्टपणे अमेरिकेसोबत चर्चा करण्यास आणि एकाच टेबलावर येऊन वाटाघाटी करण्यास नकार दिला. मागच्या बैठकीमध्ये इराण आणि अमेरिका एकाच टेबलावर चर्चेकरिता आले. मात्र, काही यश मिळू शकले नाही. त्यानंतर अमेरिका अधिक आक्रमक झाली. होर्मुज खाडीत तणाव आहे. इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आली. अमेरिकेनेही मोठी नाकेबंदी केली. यादरम्यानच तेलाच्या किमती गगणाला पोहोचत आहेत. यासर्व पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाने आपली सागरी सुरक्षा रणनीती जाहीर केली आहे. नौदल प्रमुख ॲडमिरल डी. के. त्रिपाठी यांनी नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या या रणनीतीमध्ये होर्मुज खाडीला एक प्रमुख महत्वाचे क्षेत्र म्हटले आहे. यासोबतच त्यांनी इतरही महत्वाच्या सागरी मार्गाचा उल्लेख केला. या महत्त्वाच्या मार्गांमध्ये केप ऑफ गुड होप, मोझांबिक चॅनल, बाब-अल-मंडेब, सुएझ कालवा, मलाक्का आणि सिंगापूरची सामुद्रधुनी, सुंडा सामुद्रधुनी यांचा समावेश आहे. सुंडा सामुद्रधुनीचा उल्लेख केल्याने चीनच्या पोटात गोळा उठला आहे.

मलाक्का आणि सिंगापूरच्या सामुद्रधुनीचे महत्त्व देखील यात अधोरिखित केले. ही खाडी हिंद महासागराला दक्षिण चीन मसुद्रात प्रशांत महासागराला जोडली जाते. हा मार्ग पर्शियन आखातापासून पूर्व आशिया आणि पश्चिम पॅसिफिकपर्यंतचा सर्वात लहान सागरी मार्ग आहे. मात्र, भारताने महत्वाच्या समुद्री महामार्गांचा उल्लेख केल्यानंतर चीनचे टेन्शन वाढले आहे.

होर्मुजमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत हा सुंडा सामुद्रधुनीमध्ये सक्रिय झाला. ज्यामुळे चीन तणावात आहे. चीनची आता चिंता चांगलीच वाढली. भारत आता तिथे सक्रिय होत आहे. हा चीनला मोठा दणका आहे. हिंद महासागरावर चीनची बारीक नजर आहे. आता भारत सुंडा सामुद्रधुनीवर लक्ष केंद्रीत करत आहे. भारत आणि चीनचे संबंध फार काही चांगले राहिले नाहीत. मात्र, गेल्या काही वर्षांच्या तुलनेत आता संबंध चांगले आहेत.

अमेरिकेने भारतावर 200 टक्के टॅरिफ लावल्यानंतर अमेरिकेच्या विरोधात भूमिका घेणारा चीन पहिला देश होता.  तज्ञांच्या मते, होर्मुजच्या सामुद्रधुनीतील कोणत्याही अडथळ्याचा जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होतो, कारण जगातील तेलाचा मोठा हिस्सा याच मार्गातून जातो. सध्याच्या युद्धात विविध गोष्टींवर भारत विचार करत आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल