AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगाला ज्याची प्रचंड भीती तिच मोठी घोषणा अमेरिकेकडून, थेट खळबळ, आता अमेरिका..

इराण आणि अमेरिका युद्धात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यामध्येच आता अत्यंत मोठे विधान अमेरिकेकडून करण्यात आले. अमेरिकेच्या या निर्णयाने जग तणावात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात नक्की काय सुरू आहे, याचीही चर्चा रंगत आहे. मात्र, जगाला मोठा धक्का बसला आहे.

जगाला ज्याची प्रचंड भीती तिच मोठी घोषणा अमेरिकेकडून, थेट खळबळ, आता अमेरिका..
Donald Trump
| Updated on: Apr 25, 2026 | 9:14 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धाला एक महिन्यापेक्षा अधिक काळ झाला. युद्ध कोणत्याही परिस्थिती थांबवले पाहिजे, अशी मागणी होत आहे. या युद्धाचा परिणाम जगाला भोगावा लागत आहे. मात्र, युद्धाला जसे जसे दिवस जात आहेत, तशी परिस्थिती अधिक चिघळत आहे. इराण आणि अमेरिका युद्धात जग होरपळत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्यावेळी युद्ध सुरू झाले, त्यावेळी म्हटले होते की, हे युद्ध फार तर फार 4 आठवडे सुरू असले. युद्ध थांबल्यानंतर आपोआप कच्च्या तेलाच्या किमती स्थिर होतील. मात्र, प्रत्यक्षात इराणने ज्याचा विचारही केला नाही, असे प्रतिउत्तर इराणकडून देण्यात आले. अमेरिकेला अपेक्षा होती, त्यापेक्षा अधिक काळ युद्ध सुरू आहे. सध्या इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धसंधीची घोषणा करण्यात आली. मात्र, परिस्थिती चिघळताना दिसत आहे.

होर्मुज खाडी आता अगोदरसारखी जहाजांची ये-जा करणारी जगातील महत्वाची खाडी राहिली नाही तर युद्धाचे मैदान बनले आहे. होर्मुज खाडी इराणकडून बंद करण्यात आली. होर्मुज खाडी बंद असल्याने तेलाची निर्यात आणि आयात ठप्प आहे. एलपीजीचे संकट आहे. इराणकडून सुरूवातीला सांगितले गेले की, आमच्या मित्र देशांकरिता फक्त होर्मुज खाडी खुली आहे. मात्र, त्यावेळीही तणाव होता.

अमेरिकेने होर्मुज खाडी खुली आणि सुरक्षित करण्यासाठी काही देशांची मदत मागितली. मात्र, अमेरिकेच्या मदतीला एकही देश पुढे आला नाही. होर्मुज खाडीतून जहाजांना जाऊ देण्यासाठी विशिष्ट रक्कम आकारली जात होती. यादरम्यानच इराणला धक्का देत अमेरिकेने मोठी नाकेबंदी इराणभोवती केली. इराणभोवती अमेरिकेच्या युद्धनाैका तैनात करण्यात आल्या.

त्यामध्येच आता अमेरिकेकडून अत्यंत मोठी घोषणा करण्यात आली. अमेरिकेने स्पष्ट शब्दात म्हटले आहे की, आम्ही इराणची नाकेबंदी काढणार नाहीत. अमेरिकेच्या या घोषणेने जगात खळबळ उडाली. आता प्रश्न पुन्हा तोच आहे की, इराणसोबतच्या युद्धानंतरही होर्मुज खाडीत अमेरिकेचा दबाव राहणार का? कारण काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते की, होर्मुज खाडीत शुक्ल आकारण्याचा खरा अधिकार अमेरिकेकडून आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल