AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टॅरिफच्या वादात परराष्ट्र मंत्र्यांचे विधान ऐकून सर्वांना बसला धक्का, म्हणाले, ही लहान मुलांची मैत्री नाही की…

भारत आणि अमेरिकेमध्ये टॅरिफवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. भारताने आता पहिल्यांदाच या वादात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मागील काही दिवसांपासून अमेरिकेकडून भारतावर जोरदार टीका केली जात आहे. त्याला आता अखेर उत्तर देण्यात आलंय.

टॅरिफच्या वादात परराष्ट्र मंत्र्यांचे विधान ऐकून सर्वांना बसला धक्का, म्हणाले, ही लहान मुलांची मैत्री नाही की...
S Jaishankar and Donald Trump
| Updated on: Aug 23, 2025 | 2:20 PM
Share

टॅरिफचा तणाव असतानाच आता भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी भारत आणि अमेरिकेच्या संबंधांवर थेट भाष्य केले. त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितले की, सध्या चर्चा सुरू आहे. कोणीही म्हटले नाही की, चर्चा बंद आहे. मुळात म्हणजे भारत आणि अमेरिकेची अशी मैत्री नाही की, लगेचच कट्टी होणार. भारत आणि अमेरिकेमध्ये संबंध टॅरिफच्या मुद्द्यावरून ताणले आहेत. अमेरिकेने भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावलाय. भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेला पोटदुखी होतंय. अमेरिकेने टॅरिफ लावल्यानंतर एस जयशंकर हे थेट रशियाच्या दाैऱ्यावर गेले आणि त्यांनी तिथे काहीही महत्वाची करार देखील केली.

अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावल्यानंतर अशी एक जोरदार चर्चा रंगताना दिसली की, अमेरिकेच्या दबावाखाली येऊन भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही. मात्र, एस जयशंकर यांनी अगदी स्पष्ट केले की, भारत रशियाकडून तेल खरेदी करत राहणार आहे. ज्यांना आमच्याकडून काही खरेदी करायचे नाही त्यांनी करू नये. यावेळी त्यांनी चीनच्या तेल खरेदीचा मुद्दा देखील उपस्थित केला. अनेकांना वाटतंय की, या निर्णयानंतर भारत आणि अमेरिकेतील संबंध तुटले आहेत.

भारत आणि अमेरिकेच्या सध्याच्या संबंधांवर बोलताना एस जयशंकर म्हणाले की, ही मैत्री काही लहान मुलांची नाही की, कट्टी होईल. या विधानातून एस जयशंकर यांनी अत्यंत मोठा संदेश जगाला दिला आहे. 27 ऑगस्टपासून भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला जाणार आहे. त्यापूर्वी मोठ्या घडामोडींना वेग आलाय. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढच्या आठवड्यामध्ये जपानच्या दाैऱ्यावर जाणार आहेत. अमेरिकेच्या टॅरिफच्या मुद्द्यानंतर अनेक देशांसोबत भारताकडून करार केली जात आहेत.

जर अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लागू केला तर भारत देखील अमेरिकेच्या विरोधात कडक पाऊले उचलण्यास तयार आहे. भारतीय बाजारपेठेत अनेक अमेरिकन कंपन्या असून त्या मोठ्या प्रमाणात पैसा कमावतात. काही कंपन्या तर  अशा आहेत की, त्या अमेरिकन आहेत हे युद्धा लोकांना माहिती नाहीत. भारत त्या कंपन्यांवर कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.

Follow Us
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा