
सध्या नेपाळमध्ये राजकीय भूकंप आला आहे. पंतप्रधान ओली आणि त्यांच्या सरकराने देशातील सोशल मीडियावर बंदी घातली होती. या बंदीविरोधात लाखो Gen Z रस्त्यावर आले आणि सोशल मीडिया बंदी व भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करु लागले. आंदोलक इतके आक्रमक झाले की पंतप्रधान ओली यांच्यासह त्यांच्या सरकारमधील चार नेत्यांना राजिनामा द्यावा लागला. काही आंदोलकांनी इतर नेत्यांच्या घरावर गोळीबार केला तर काहींची घरे जाळून टाकली. इतक्या भयंकर परिस्थितीनंतर नेपाळी सेनेने राजधानी काठमांडूमध्ये पुन्हा नियंत्रण मिळवले आहे. सेनेने निषेध मोडून काढण्यासाठी राजधानीच्या रस्त्यांवर गस्त घातली. सैन्याचे अधिकारी लाऊडस्पीकरद्वारे राजकीय पोकळीच्या काळात शांतता राखण्याचे आवाहन करत होते. त्यानंतर नेपाळी मिलिटरीची चर्चा सुरु झाले आहे. ती किती मोठी आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. नेपाळमधील या सैन्य कारवाईचे नेतृत्व वरिष्ठ कमांडर करत आहेत. या सेनेचे एकच उद्दीष्ट आहे की देशात शांतता प्रस्थापित करणे आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे संरक्षण करणे...