AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचं टेन्शन वाढलं ! कोरोनापेक्षाही भयंकर व्हायरसचा पहिला रूग्ण सापडला, दिल्लीत बैठक, घामातूनच…

भारताला ज्याची भीती तेच घडल्याचे बघायला मिळत आहे. इबोला हा खतरनाक व्हायरस भारतापर्यंत पोहोचला आहे. ज्याने मोठी खळबळ उडाली. भारत सरकारने काही गाईडलाईन यापूर्वीच जारी केल्या आहेत. दिल्लीमध्ये याबाबत महत्वाची बैठक पार पडली.

भारताचं टेन्शन वाढलं ! कोरोनापेक्षाही भयंकर व्हायरसचा पहिला रूग्ण सापडला, दिल्लीत बैठक, घामातूनच...
Ebola virus
| Updated on: May 27, 2026 | 10:00 AM
Share

आफ्रिकी देशांमध्ये थैमान घालत असलेला इबोला हा खतरनाक व्हायरस भारतात पोहोचला आहे. ज्याची भीती तेच घडलंय. रिपोर्टनुसार, युगांडाहून भारतात आलेल्या महिलेमध्ये इबोला व्हायरससारखी सर्व लक्षणे दिसत आहेत. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, महिलेला सध्या कॉरंटीन करून ठेवण्यात आले. मात्र, या घटनेने आरोग्य यंत्रणांची धाबे दणाणली आहेत. हा व्हायरस कोरोनापेक्षाही कितीतरी जास्त पट धक्कादायक आणि भयंकर आहे. या व्हायरलमध्ये कोरोनापेक्षाही अधिक मृत्यू दर आहे. युगांडा, कांगो, सूडान यासारख्या देशात या व्हायरसने थैमान घातले. या व्हायरसने तिथे अवघ्या काही दिवसातच 200 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला. दिवसेंदिवस या रूग्णांची संख्या वाढत आहे. हा व्हायरस इतका घातक असण्याचे मुख्य कारण म्हणजे 50 ते 90 टक्क्यांपर्यंत याचा मृत्यू दर आहे. या व्हायरसमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव, सर्दी खोकल्याची लक्षणे दिसतात.

रक्त, घाम यांच्या संपर्कात आल्याने हा व्हायरस पसरतो. हैराण करणारी बाब म्हणजे अजून या व्हायरसवर कोणत्याही प्रकारचे आैषध किंवा इंजेक्शन नाहीये. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचे जीव जात आहेत. भारत सरकारकडून याच पार्श्वभूमीवर लोकांना या देशात न जाण्याचा सल्ला देण्यात आला. केंद्रीय आरोग्य मंत्री प्रकाश नड्डा यांनी या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कालच महत्वाची बैठक घेतली.

त्यांनी उपयोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. काही गाईडलाईनही तयार करण्यात आल्यात. DGCA ने विमान कंपन्यांही सूचना दिल्या आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये WHO ने काही आपत्कालीन परिस्थितीची घोषणा केली आहे. विमान कंपन्यांना सर्तक राहण्याचे आणि बारीक बारीक गोष्टींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना या देण्यात आल्यात.

भारतात हा व्हायरल दाखल होण्यापूर्वीच काळजी घेतली जात होती. हा व्हायरल इतका जास्त भयंकर आहे की, आपण एखाद्या व्यक्तीच्या घामाच्याही संपर्कात आलो, तरीही हा व्हायरल पसरतो. कोणत्याही परिस्थितीमध्ये स्थिती नियंत्रणात ठेवण्याकरिता अगोदरच प्रयत्न केली जात आहेत. 2020 मध्ये भारतात कोरोनाने कहर केला. कोरोनामुळे अनेक लोकांचे मृत्यू झाले.

Follow Us
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी