FlyDubai Flight प्रकरणात ओमानी वैमानिकाच्या खुलाशाने डोक चक्रावेल, Plan B ऐकाल तर…
Flydubai Flight Incident: फ्लायदुबई प्रकरणाने जगात खळबळ उडाली आहे. या फ्लाईटमधील हल्ला प्रकरणाचा तपास सुरु आहे. या तपासात हा हल्ला ऑक्टोबरमध्ये नाही तर जुलैमध्ये होणार होता पण मग का झाला नाही यामागचे कारणही त्याने सांगितले आहे.

Flydubai Flight: फ्लायदुबई प्रकरणाने जगात खळबळ उडाली आहे. या फ्लाईटमधील हल्ला प्रकरणाचा तपास सुरु आहे. या तपासात वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या आहेत. आता तपासात एक अशी गोष्ट समोर आली आहे ज्याने सर्वांनाच धक्का बसेल. हा हल्ला ऑक्टोबरमध्ये नाही तर जुलैमध्ये होणार होता.
ओमानचा वैमानिक हमाम अल-हमामी याने विमान इस्रायलमधील तेल अवीव येथे नेऊन बेन गुरियन विमानतळावर एखाद्या इमारतीवर किंवा दुसऱ्या विमानावर आदळवण्याची योजना आखली होती. कॅप्टन स्मिट मॉस्किटो यांच्या शौर्यामुळे ही योजना हाणून पाडण्यात आली. माध्यमांच्या वृत्तानुसार, अल-हमामीने अधिकाऱ्यांना दिलेल्या आपल्या जबाबात म्हटले आहे की, “विमान पाडण्याची माझी योजना मला ऐनवेळी सुचलेली नव्हती. फ्लायदुबईमध्ये नोकरी मिळण्यापूर्वीच त्याने ही योजना आखली होती. मी तेल अवीवला विमानसेवा देणाऱ्या एअरलाइनचा शोध घेतला आणि याच कारणास्तव फ्लायदुबईची निवड केली.”
तपासानुसार, सह-वैमानिकाने कॉकपिटमध्येच कॅप्टन स्मित मछार यांना ठार मारून विमानाचा ताबा घेण्याची योजना आखली होती. उड्डाणादरम्यान त्याने कॅप्टन मछार यांच्यावर हल्ला केल्यामुळे ही योजना अयशस्वी झाली असली तरी, तरीही त्याला हवं ते करता आलेले नाही. असेही वृत्त आहे की, हा हल्ला विमान जॉर्डनवरून उडत असताना झाला. जखमी असूनही, कॅप्टन स्मित कॉकपिटमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. त्यानंतर प्रवाशांनी त्वरीत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि हल्लेखोराला ताब्यात घेण्यास मदत केली.
अहवालांनुसार, अल-हम्मामीने तपास अधिकाऱ्यांना असेही सांगितले की, “जर मला विमान इस्रायलला उडवता आले नसते तर माझ्याकडे प्लॅन बी होता बेन गुरियन विमानतळावर विमान पाडण्याची माझी योजना होती. जर तेही शक्य झाले नाही, तर जॉर्डनमधील एका अमेरिकी लष्करी तळावर विमान वळवण्याची माझी योजना होती. हा हल्ला खरं तर जुलैमध्ये करण्याचे नियोजित होते, पण काही कारणास्तव तेव्हा तो हल्ला करायाचा राहून गेला.” आणखी तपास सुरु असून आता काय काय माहिती समोर येते याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.