जगातील सर्वात खतरनाक शहराच्या यादीत कराचीचा नंबर, सर्वात सुरक्षित शहर कोणते ?
फोर्ब्ज एडवायझर लिस्टचा अहवाल आला आहे. या अहवालाने पाकिस्तानचे टेन्शन वाढविले आहे. या अहवालाने पाकिस्तानच्या पर्यटनातून विदेशी डॉलर कमाविण्याच्या आकांक्षावर पाणी फेरले आहे. कराची शहर पर्यटकासाठी धोका असलेल्या शहरात सामील झाले आहे.

फोर्ब्ज एडवायझर लिस्टचा अहवाल आला आहे. या अहवालानूसार आपला शेजारी पाकिस्तानचे शहर कराची याल पर्यटकांच्या जीवाला धोका असलेल्या शहराच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. कराची शहराला 100 पैकी 93.12 रेटिंग मिळाले आहे. या यादीत व्हेनेझुएलाचे काराकास हे शहर जगातील पर्यटकांसाठी सर्वात धोकादायक असल्याचे एडव्हायझरी देण्यात आली आहे. नुकताच अमेरिकेने देखील भारतातील जम्मू आणि कश्मीर आणि तसेच मणिपूर येथे जाऊ नये असे आदेश अमेरिकन नागरिकांना दिले आहेत.
पाकिस्तान आर्थिक आघाडीवर कंगाल झाला आहे. त्यामुळे पर्यटनातून तरी गंगाजळी भरण्याची त्यांची इच्छा अधूरी राहणार आहे. कारण कराची हे जगातील दुसरे सर्वात धोकादायक शहर बनले आहे. कराचीला 100 पैकी 93.12 रेटिंग दिले आहे. पर्यटकांनी कराची जाऊ नये असा सल्ला या संस्थेने दिला आहे. कराचीत हिंसा, गुन्हेगारी आणि अतिरेकी हल्ल्याचा धोका आहे. महागाईने कळस गाठल्याने पाकिस्तानात लुटमार आणि गोळीबार अशा घटना नेहमीच्या होत असतात. या अहवालाने कराची शहर राहण्यासाठी योग्य नसल्याचे म्हटले आहे.
गुरुवारी पाकिस्तानातील कराची शहरात संरक्षक क्षेत्रात दोन समुदायात गोळीबाराची घटना होऊन पाच लोकांना मृत्यू झाला आहे असे एआरवाय न्यूजने बातमी दिली आहे. या यादीत व्हेनेझुएलाचे काराकास जगातील सर्वात खतरनाक शहराच्या यादी पहिल्या स्थानावर आहे. या शहराला 100 पैकी 100 गुण मिळाले आहे. दुसऱ्या क्रमांकावर कराची तर म्यानमार म्हणजेच ब्रह्मदेशातील यांगून तिसरे सर्वात धोकादायक शहर आहे.
सर्वात सुरक्षित शहर कोणते ?
या अहवालात सिंगापूर या शहराला 100 पैकी 0 रेटिंग मिळाल्याने ते जगातील सर्वात सुरक्षित शहराच्या यादीत पहिले आले आहे. सुरक्षा, किमान नैसर्गिक दुर्घटनांची धोका आणि उत्कृष्ट आरोग्याच्या आणि वाहतूकीच्या सुविधा यामुळे सिंगापूर हा जगातील पर्यटकांच्या वास्तव्यासाठी सर्वात सुरक्षित मानला जात आहे. तर कॅनडाचे टोरंटो शहर जगातील तिसरे सर्वात सुरक्षित शहर आहे.
सुरक्षित शहरात : 1) सिंगापूर 2) जपान 3) टोरंटो – कॅनडा 4) सिडनी – ऑस्ट्रेलिया 5) झुरीच स्वित्झर्लंड
धोकादायक शहरे : 1) काराकास – व्हेनेझुएला, 2)कराची 3) म्यानमार – यांगून 4) लगोस-नायजेरिया 5) मनिला – फिलीपाईन्स
