
पाकिस्तानमध्ये मोठे वादळ आले असून माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे संस्थापक इम्रान खान यांचे निधन झाल्याचे सांगितले जात आहे. इम्रान खान यांच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप केला. मागच्या काही आठवड्यांपासून इम्रान खान यांना त्यांच्या कुटुंबियांना भेटू दिले जात नाही. पाकिस्तान सरकार कोर्टाच्या आदेशालाही जुमानत नसल्याचा आरोप आहे. इम्रान खान यांच्यावरून पाकिस्तानातील लाहोर आणि रावळपिंडीच्या रस्त्यांवर तणाव वाढत आहे. त्यामध्येच आता इम्रान खान यांच्या मुलाने मोठा दावा करत थेट धमकीच देऊन टाकली आहे. इम्रान खान निरोगी असल्यास त्यांच्या भेटींवर बंदी का घातली जाते असा प्रश्न त्यांच्या कुटुंबियांकडून उपस्थित केला जात आहे. इम्रान खान यांच्या बहिणींना देखील जेल प्रशासनाने त्यांना भेटू दिले नाही. त्यांची मुले देखील त्यांना भेटण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
इम्रान खान यांची बहीण नूरिन नियाझी यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. इम्रान खान यांचा मुलगा कासिम खान याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सरकारला मोठी धमकी दिली. कासिम खान याने म्हटले की, पाकिस्तान सरकारने माझ्या वडिलांना पूर्णपणे वेगळे केले आहे आणि कुटुंबाला भेटू दिले जात नाहीये. माझ्या वडिलांना अटक करून आज 845 दिवस झाले आहेत.
मागच्या सहा आठवड्यांपासून त्यांना कोणालाही भेट दिले जात नाही. वकिलांना पण भेटू दिले जात नाही. त्यांच्या बहिणींना देखील भेटू दिले जात नाहीये, कोर्टाच्या आदेशानंतरही. फक्त हेच नाही तर फोनवरून साधे संभाषणही करू दिले जात नाही. त्यांची तब्येत कशी आहे, याचीही साधी माहिती नाही. मी आणि माझा भाऊ कोणत्याही पद्धतीने आमच्या वडिलांसोबत संपर्क करू शकत नाहीत. काहीतरी मोठा कट रचला गेला आहे.
मुळात म्हणजे आमच्या कुटुंबियांना हे देखील माहिती नाही की, ते कसे आहेत काय आहेत. मी आंतरराष्ट्रीय समुदायाला, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांना आणि प्रत्येक लोकशाहीवादी आवाजाला तात्काळ हस्तक्षेप करण्याचे आवाहन करतो. त्यांना राजकीय कारणामुळे जेलमध्ये ठेवण्यात आलंय. इम्रान खानच्या समर्थनार्थ रात्री उशिरापर्यंत शेकडो पीटीआय कार्यकर्त्यांनी आदियाला तुरुंगाबाहेर धरणे आंदोलन केले. माझ्या वडिलांना काही झाले तर सरकारला सोडणार नसल्याची थेट धमकी इम्रान खान यांच्या मुलाने दिली. हेच नाही तर पूर्ण पाकिस्तानमध्ये आंदोलने सुरू करण्याचा इशारा दिला आहे.