डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर त्यांचाच निर्णय भारी, धोक्याची घंटा वाजली, भारतावर टॅरिफ लावल्याने..

America Tariff India : डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरोधात चुकीची भूमिका घेतली असून सातत्याने टॅरिफच्या धमक्या त्यांच्याकडून दिल्या जात आहेत. डोनाल्ड ट्रम्पने भारतावर टॅरिफ लावून मोठी चूक केल्याचे आता अमेरिकेकडूनच सांगितले जातंय.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर त्यांचाच निर्णय भारी, धोक्याची घंटा वाजली, भारतावर टॅरिफ लावल्याने..
Donald Trump
| Updated on: Oct 20, 2025 | 12:32 PM

ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर भारत-अमेरिकेतील अनेक वर्षांचे चांगले संबंध तणावात आहेत. हे संबंध तयार करण्यासाठी काही वर्ष गेली. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावून ही संबंध काही महिन्यात खराब केली. अमेरिकेसाठी पहिल्यापासूनच भारत हा महत्वाचा देश राहिला आहे. अमेरिकेला देखील स्पष्ट माहिती आहे की, जर त्यांना चीनला शह द्यायचा असेल तर त्यांना भारताशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. मात्र, हे असूनही भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेने भारतावर इतका मोठा टॅरिफ लावला. या टॅरिफनंतर भारत आणि अमेरिकेतील व्यापार चर्चा देखील जवळपास बंदच आहे. भारताने टॅरिफनंतर अमेरिकेसाठी धोकादायक असलेली दारे देखील उघडली आहेत. भारतावरील टॅरिफनंतर अमेरिकेलाच तोटा सहन करावा लागलोय.

भारतातील अमेरिकेचे माजी राजदूत एरिक गार्सेट्टी यांनी यादरम्यानच अत्यंत मोठे विधान केले असून भारतावर टॅरिफ लावणे किती मोठी चूक आहे, हे सांगितले. त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, ट्रम्प प्रशासनाने भारतावर निर्बंध लादणे ही एक चूक होती. भारताने युरोप आणि अमेरिकेला जे हवे होते तेच केले. त्यांनी पुढे भारताबद्दल बोलताना म्हटले की, भारत हा एक विस्तारवादी शक्ती नाही. भारताने कधीच इतर देशांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न केला नाही.

भारत फक्त तेच मिळवण्याचा प्रयत्न करतो जे त्याचे आहे आणि त्यासाठी तो पात्र आहे. भारताचे बहुसंरेखन धोरण असंलग्न आहे. भारतातील नागरिकांना त्याचा अभिमान आहे. त्यांनी अगदी स्पष्ट म्हटले की, भारतासोबत संबंध बिघडवण्यात अमेरिकेचाच सर्वाधिक तोटा आहे. गार्सेट्टी पुढे म्हणाले, भारत असे काही दरवाजे उघडू शकतो जिथे अमेरिकेसाठी पोहोचणे कठीण आहे. भारत केवळ आर्थिक आणि धोरणात्मक हितांचे रक्षण करत नाही तर स्वत:ची प्रतिमा देखील मजबूत बनवते.

गार्सेट्टी यांनी स्पष्ट केले की, भारत आणि अमेरिकेच्या संबंधात यापूर्वीही मतभेद नक्कीच राहिलेले आहेत. मात्र, भारताचे धोरण नेहमीच शांततापूर्ण आणि संतुलित राहिले आहे. ट्रम्प यांनी भारताबद्दल घेतलेला टॅरिफचा निर्णय अत्यंत चुकीचा असल्याचे अमेरिकेतूनही म्हटले जातंय. ट्रम्प यांच्या विरोधात लोक थेट मैदानात उतरताना देखील दिसत आहेत. मात्र, ट्रम्प यांना आपली चूक अजूनही कळाली नसून ते भारताला अजनू टॅरिफच्या धमक्या देताना दिसत आहेत.