AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

G7 Summit : जागतिक एकता आणि नवीन भागीदारींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून भर

 G7 Summit : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी फ्रान्समधील एव्हियन येथे आयोजित G7 शिखर परिषदेत महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केलं... मोदी यांनी G7 शिखर परिषदेच्या 'आउटरीच' सत्राला संबोधित केलं. यावेळी त्यांनी नवीन भागीदारी निर्माण करणे आणि आंतरराष्ट्रीय एकता पुन्हा दृढ करणे या विषयांवर आपले विचार मांडले.

G7 Summit : जागतिक एकता आणि नवीन भागीदारींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून भर
PM Narendra Modi
| Updated on: Jun 17, 2026 | 11:31 AM
Share

G7 Summit : पंतप्रधान नरेंद्र महत्त्वाच्या मुद्यांवर जनतेला संबोधित करत असतात. आता त्यांनी यांनी G7 शिखर परिषदेच्या ‘आउटरीच’ सत्राला संबोधित केलं. मंगळवारी फ्रान्समधील एव्हियन येथे आयोजित G7 शिखर परिषदेत महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की, आजच्या एकमेकांना जोडलेल्या जगात ऊर्जा, अन्न, आरोग्य, सायबर आणि आर्थिक सुरक्षा हे घटक एकमेकांशी घट्टपणे गुंफलेले आहेत; म्हणूनच, मानवतेच्या प्रगती आणि समृद्धीसाठी मजबूत आंतरराष्ट्रीय भागीदारी अत्यंत आवश्यक आहे.

सध्या जगात अनिश्चिततेचं वातावरण आहे. यावर देखील मोदी यांनी लक्षवेधी वक्तव्य केलं आहे. ‘सध्याच्या अनिश्चित जागतिक परिस्थितीत व्यापार आणि तंत्रज्ञानाचा वापर संकुचित हितसंबंधांसाठी केला जात आहे. याच कारणामुळे राष्ट्रांमध्ये विश्वासाचं संकट पुढे उभं राहिलं आहे. यावेळी मोदी यांनी कोविड 19 दरम्यान आलेल्या संकटाचं संदर्भ देत म्हणाले, ‘विविध देशांना जागतिक भागीदारीमध्ये विश्वास आणि पारदर्शकतेला प्राधान्य देण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं.

आंतरराष्ट्रीय सहकार्याबाबत भारताचा दृष्टिकोन मांडताना पंतप्रधान मोदी यांनी मोठं वक्तव्य केलं, भारताने नेहमीच ‘मानवता प्रथम’ या तत्त्वाचे पालन केलं आहे. हाच विचार International Solar Alliance, Coalition for Disaster Resilient Infrastructure, Global Biofuel Alliance, मिशन LiFE आणि ‘एक पेड़ माँ के नाम’ यांसारखे अभियान राबवण्यात आले.

एवढंच नाही तर, जगभरातील विविध देशांना नैसर्गिक आपत्तींच्या काळात मदत करण्यासाठी भारत सर्वात आधी पुढे आला असं देखील मोदी म्हणाले. श्रीलंकेत आलेलं चक्रिवादळ, अफगाणिस्तान येथील भूकंप, मोझांबिकमधील पूर आणि जमैकामधील वादळ या संकट काळात भारताने मदत पोहोचवली.

पुढे पंतप्रधान मोदी असं देखील म्हणाले की, ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ या मंत्राने आर्थिक समावेशन, आरोग्य सुरक्षा, डिजिटल ओळख, तंत्रज्ञानावर आधारित सक्षमीकरण आणि महिलांच्या नेतृत्वाखालील विकास यांना चालना देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

आंतरराष्ट्रीय कायद्यांबद्दलच्या आदराचा अभाव…

पंतप्रधान म्हणाले, आंतरराष्ट्रीय भागीदारींनी ‘देणारा आणि घेणारा’ (Donor-Recipient) या पारंपरिक मानसिकतेच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे. आंतराष्ट्रीय स्तरावर समान भागीदारी आणि परस्पर एकजुटीच्या आधारावर विकसित व्हायला हव आंतरराष्ट्रीय कायद्यांबद्दलचा आदराचा अभाव हा जागतिक एकजुतील सर्वात मोठा अडथळा आहे आणि या समस्येकडे प्राधान्याने लक्ष देणं आवश्यक आहे. असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी