Dharmendra Pradhan: हे तर राजकीय नाटक! राहुल गांधींच्या ‘छात्रो की गूंज’ कार्यक्रमावर धर्मेंद्र प्रधान यांचा पलटवार, आकेडवारीसह मुद्दा खोडला
Dharmendra Pradhan on Rahul Gandhi: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या इंदूरमधील छात्रो की गुंज कार्यक्रमावर आता भाजपमधून तीव्र आणि तिखट प्रतिक्रिया येत आहेत. भाजप नेते आणि माजी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या कार्यक्रमावर सडकून टीका केली आहे.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी इंदूर येथील छात्रों की गुंज कार्यक्रमात शिक्षण व्यवस्थेसह सरकारवर निशाणा साधला. त्यानंतर आता भाजप गोटातून त्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेण्यात आला आहे. माजी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांना आक्रमक उत्तर दिले आहे. राहुल गांधी मायक्रोफोन हातात घेऊन व्यवस्थे विरुद्ध विद्यार्थी असा बनाव करत असल्याचा आरोप प्रधान यांनी केला. भाजप आणि त्यांच्या इतर संस्थांनी व्यवस्थेवर ताबा मिळवल्याचा कांगावा सुरू असल्याचा खोटा प्रचार राहुल गांधी करत असल्याचा आरोप प्रधान यांनी केला. विद्यार्थ्यां आडून राजकारण करू नका, तर त्यांना ठोस उत्तर द्या, असे आवाहनही त्यांनी केले. आकडेवारीसह राहुल गांधींना उत्तर ...
