AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई कोस्टल रोडवर BMW कारचा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

मरीन ड्राईव्हहून हाजीअलीच्या दिशेने जाताना अति वेगामुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मुंबई कोस्टल रोडवर BMW कारचा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू
BMW accidentImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 20, 2026 | 10:06 AM
Share

मुंबईतील कोस्टल रोडवर रविवारी पहाटे एका भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला, तर एकाची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात लाला कॉलेजसमोर, लोटस जेटीजवळ घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या BMW कारचा हा अपघात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

घटना पहाटे साडेपाच वाजता घडली. मरीन ड्राईव्हहून हाजीअलीच्या दिशेने जात असताना कारचा वेग जास्त असल्याने चालकाने नियंत्रण गमावल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या अपघातात कारमधील चार जण जखमी झाले. त्यांना तातडीने नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तीन जणांना मृत जाहीर करण्यात आले. मृत झालेल्यांमध्ये शानय गज्जल (२१), धिर्या सेठ (१७) आणि एक २५ वर्षीय अनोळखी तरुण यांचा समावेश आहे. चौथ्या २० वर्षीय तरुणाची प्रकृती गंभीर असून त्याला ट्रॉमा वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत.

घटनास्थळी पोलिसांची धाव

अपघातानंतर परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिसर सील केला आणि पुढील तपास सुरू केला. कारचा ताबा घेण्यात आला असून ती तांत्रिक तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. अपघाताचे नेमके कारण आणि कारचा वेग किती होता, याबाबत अधिक माहिती तपासाअंती समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.

कोस्टल रोड हा मुंबईतील आधुनिक आणि आकर्षक रस्ता असला तरी रात्री-पहाटे येथे अतिवेगाने गाड्या चालवल्या जात असल्याच्या तक्रारी वारंवार येत असतात. यापूर्वीही येथे वेगामुळे अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनेने पुन्हा एकदा रस्त्यावरील शिस्तीचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

नायर रुग्णालयात मृतदेहांचे पोस्टमॉर्टम

नायर रुग्णालयात मृतदेहांचे पोस्टमॉर्टम करण्यात येणार आहे. २५ वर्षीय अनोळखी तरुणाच्या नातेवाईकांचा शोध पोलिस घेत आहेत. गंभीर जखमी तरुणावर डॉक्टरांचे लक्ष आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू ठेवला आहे. या दुर्घटनेने तीन तरुणांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

Follow Us
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय....
Sharad Pawar Health Update : शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय तपासण्या सुरू
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
Shiv Sena Symbol Row : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
Payal Zambare Case : पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित....
Umesh Patil On Rohit Pawar : आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित पवारांना थेट सवाल
राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या....
NCP Meeting Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या खात्यांबाबत उपस्थित केले प्रश्न
गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त...
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त संचालकांमुळे सत्तेचं गणितच बदललं
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक, 5 वेळा लुटमार; प्रवाशांमध्ये भीती
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल