अमेरिकेने दिला धोका, आता ‘या’ देशाने भारतीयांसाठी उघडला दरवाजा, ट्रम्प यांच्यावर केली सडकून टीका

डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी भारतावर 50 टक्के कर लादला होता, त्यानंतर आता एच-1बी व्हिसावर वार्षिक 1 ला डॉलर्सचे मोठे शुल्क लादण्याच्या निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता अमेरिकेत जाणाऱ्या भारतीयांवर संकट ओढवले आहे. अशातच आता भारतासाठी जर्मनीने पुढाकार घेतला आहे.

अमेरिकेने दिला धोका, आता या देशाने भारतीयांसाठी उघडला दरवाजा, ट्रम्प यांच्यावर केली सडकून टीका
Donald-Trump Visa
| Updated on: Sep 24, 2025 | 4:48 PM

गेल्या काही महिन्यांमध्ये अमेरिकेने भारताला मोठे धक्के दिले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी भारतावर 50 टक्के कर लादला होता, त्यानंतर आता एच-1बी व्हिसावर वार्षिक 1 ला डॉलर्सचे मोठे शुल्क लादण्याच्या निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता अमेरिकेत जाणाऱ्या भारतीयांवर संकट ओढवले आहे. अशातच आता भारतासाठी जर्मनीने पुढाकार घेतला आहे. भारतातील जर्मन राजदूत फिलिप अकरमन यांनी भारतीय व्यावसायिकांना जर्मनीमध्ये नोकरी किंवा व्यवसाय शोधण्याचे आवाहन केले. आम्ही भारतीयांसाठी उत्तम नोकरीच्या संधी देऊ आणि आमची धोरणे स्थिर आणि विश्वासार्ह आहेत.

अमेरिकेने फी वाढवली

फिलिप अकरमन यांच्या विधानाचा रोख हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर होता. ट्रम्प यांनी भारतीयांना अमेरिकेत काम करण्यापासून रोखण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिका फर्स्ट धोरणाचे अनुसरण करून ट्रम्प यांनी भारतीय कामगारांसाठी व्हिसाचे नियम बदलले आहेत. आता एच-1बी व्हिसा शुल्क $1 लाख (अंदाजे 88 लाख रुपये) पर्यंत वाढवले ​​आहे. त्यामुळे अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांची चिंता वाढली आहे.

आमच्याकडे या…

जर्मनीचे राजदूत फिलिप अकरमन यांनी अमेरिकेच्या धोरणांवर टीका केली आहे. ‘जर्मनीचे इमिग्रेशन धोरण जर्मन कारसारखे विश्वासार्ह, आधुनिक आहे. आम्ही अमेरिकेसारखे रातोरात नियम बदलत नाही. जर्मनी आयटी, व्यवस्थापन, विज्ञान आणि तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात भारतीयांचे स्वागत करते आणि भारतीयांना नोकरीबाबत स्थिर वातावरण मिळेल. आधीपासून भारतीय व्यावसायिक जर्मनीमध्ये मोठ्या संख्येने काम करत आहेत. त्यांचे सरासरी उत्पन्न जर्मन नागरिकांपेक्षाही जास्त आहे. आम्ही इतरही लोकांचे स्वागत करतो.

एच-1बी व्हिसा फी वाढली

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलिकडेच एच-1बी व्हिसावर दरवर्षी $1 लाख अतिरिक्त शुल्क लादण्याचा निर्णय घेतला. यामुळे अमेरिकन आयटी उद्योग हादरला आहे. याचे कारण म्हणजे हे क्षेत्र भारतीय आणि चिनी व्यावसायिकांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. 70 टक्के एच-१बी व्हिसा भारतीयांकडे आहेत, म्हणजेच 2 लाखांपेक्षा अधिक भारतीयांवर या निर्णयाचा परिणाम होऊ शकतो.  मात्र आता जर्मनीने भारतीयांना आपल्या देशात येण्याचे आवाहन केल्याने नोकरदारांची चिंता काही प्रमाणात कमी झाली आहे.