
आखाती देश कुवैतमध्ये लग्नाबाबतचा एक अहवाल समोर आला आहे. या अहवालाच्या मते येथील कुवैती तरुणी इतर देशांच्या तरुणांशी विवाह करत आहेत.त्यांना कुवैत बाहेरी तरुण आवडू लागले आहेत. अहवालानुसार या वर्षी जानेवारी ते जूनपर्यंत १९ हजाराहून अधिक कुवैती तरुणींनी परदेशी तरुणांशी लग्न केले आहे. यातील ७०० तरुण हे आशियाई मूळ असलेले आहेत.
अरब टाईम्सच्या नुसार यात सर्वाधिक कुवैतमध्ये नोकरी करत असलेल्या इतर आखाती देशातील तरुणांचा समावेश आहे. कुवैतमध्ये तरुणींच्या या लग्नाच्या ट्रेंडने सरकार आणि स्थानिय लोकांचे टेन्शन वाढवले आहे.
कुवैतच्या स्थानिक सरकारने जे आकडे जारी केले आहेत. त्यानुसार यावर्षी जूनपर्यंत सुमारे ७०० कुवैती तरुणींना आशियाई देशातून आलेल्या तरुणांशी विवाह केला आहे.याचप्रकारे अरब देशांतील तरुणांशी लग्न करणाऱ्यांची संख्या सुमारे १८ हजाराच्या आसपास आहे.
युरोप आणि अमेरिकी देशातील तरुणांशी लग्न करणाऱ्या तरुणींची संख्या ६०० च्या आसपास आहे. सुमारे दोन लाख तरुणींनी कुवेती तरुणांशी लग्न केले आहे. कुवेत सरकारने यास मोठी कामगिरी म्हटले आहे.
कुवैत सरकारने म्हटले आहे की गैर कुवैती तरुणांशी लग्नाचा हा ट्रेंड रोखण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. सरकारचा प्रयत्न यास झीरोवर आणण्याचा आहे. परंतू आकड्यात मात्र सातत्याने वाढच सुरु आहे.
कुवैतने परदेशी तुरुणांशी लग्न करण्याचा हा ट्रेंड रोखण्यासाछी या वर्षीच्या सुरुवातीला नागरिता कायदा आणला होता. यात म्हटले होते की कोणा कुवैती तरुणीशी लग्न केल्याने त्याना कुवैतची नागरिकता मिळेलच असे नाही !
कुवैतची एकूण लोकसंख्या ८० लाखाच्या आसपास आहे. ज्यात कुवैत सुमारे ३० लाख परदेशी लोक राहात असून त्यात भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे. भारतातील सुमारे १० लाख नागरिक कुवैतमध्ये रहातात. कुवैत परदेशी पुरुषांची संख्या सुमारे २० लाख आहे.
कुवैतमध्ये परदेशी लोकांसाठी लग्नाचे नियम एकदम सोपे आहेत. यासाठी सर्वात आधी आपल्या देशाकडून एनओसी लागते. तसेच लग्नाकरीता संबंधित व्यक्तीला कुवैत नियम पाळावे लागतात. कुवैत हा आखातातील एक श्रीमंत देश आहे.