AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

..तर पुन्हा हिंदू व्हा; वादानंतर ए. आर. रहमान यांना प्रसिद्ध गायकाचा सल्ला

ए. आर. रहमान यांच्या 'सांप्रदायिक' टिप्पणीवरून मोठा वाद सुरू आहे. अनेकांनी त्यावरून टीका केली आहे. अशातच एका प्रसिद्ध भजन गायकाने ए. आर. रहमान यांना अजब सल्ला दिला आहे. त्यावरून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

..तर पुन्हा हिंदू व्हा; वादानंतर ए. आर. रहमान यांना प्रसिद्ध गायकाचा सल्ला
A R RahmanImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 21, 2026 | 12:53 PM
Share

ऑस्कर विजेते संगीतकार आणि गायक ए. आर. रहमान यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गेल्या 8 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये त्यांना काम मिळणं बंद झाल्याचं मान्य केलं. बॉलिवूड इंडस्ट्री आता अधिक सांप्रदायिक झाल्याचीही टिप्पणी त्यांनी केली होती. तर विकी कौशलचा ‘छावा’ हा चित्रपट फूट पाडणारा असल्याचं मत रहमान यांनी मांडलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अनेकांनी सांप्रदायिकतेमुळे त्यांना काम न मिळण्याच्या तक्रारीला विरोध केला. याप्रकरणी आता भजनसम्राट अनुप जलोटा यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. अनुप जलोटा यांनी थेट रहमान यांना धर्मांतर करण्याचा सल्ला दिला आहे.

काय म्हणाले अनुप जलोटा?

‘आयएएनएस’ला दिलेल्या मुलाखतीत अनुप जलोटा म्हणाले, “जर ए. आर. रहमान यांना असं वाटत असेल की धर्माच्या कारणामुळे त्यांना काम मिळत नाहीये, तर त्यांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारण्याविषयी विचार करावा.” यावेळी अनुप जलोटा यांनी रहमान यांच्या पार्श्वभूमीचा उल्लेख करत सांगितलं की ते आधी हिंदू होते आणि नंतर त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता. त्यानंतरही त्यांनी संगीत विश्वात प्रचंड लोकप्रियता मिळवली, पैसा-प्रसिद्धी कमावली आणि लोकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. परंतु जर रहमान यांना असं वाटत असेल की धर्मामुळे त्यांना कामाच्या संधी मिळेनासे झाले आहेत, तर त्यांनी आपला जुना धर्म पुन्हा स्वीकारण्याविषयी विचार करावा, असा सल्ला जलोटा यांनी दिला.

याविषयी जलोटा पुढे म्हणाले, “जर त्यांना या गोष्टीवर विश्वास असेल की आपल्या देशात मुस्लीम असल्या कारणाने त्यांना काम मिळत नाहीये, तर त्यांनी पुन्हा हिंदू व्हावं. त्यांना असा विश्वास असावा की हिंदू असल्याने त्यांना पुन्हा चित्रपट मिळतील. रहमान यांच्या म्हणण्याचा हाच अर्थ होता. म्हणून मी त्यांना हिंदू धर्म स्वीकारण्याचा प्रयत्न करण्याचा सल्ला देतोय. त्यानंतर त्यांनी पुन्हा काम मिळतंय का, ते पहावं.”

‘बीबीसी एशियन नेटवर्क’ला दिलेल्या मुलाखतीत रहमान यांना विचारलं गेलं की, अनेक निर्माते आणि कलाकारांनी दावा केला की बॉलिवूडमध्ये तमिळ समुदायासोबत भेदभाव होतो. 1990 च्या दशकात ही स्थिती कशी होती? त्यावर ते म्हणाले, “मला असं कधी जाणवलं नाही किंवा कदाचित माझ्यापासून ते लपवलं गेलं असावं. गेल्या 8 वर्षांत कदाचित सत्ता बदलली आहे आणि जे क्रिएटिव्ह नाहीत, ते निर्णय घेत आहेत. यात कदाचित काही सांप्रदायिक गोष्टीही असतील, पण मला थेट कोणी काही सांगितलेलं नाही. काही गोष्टी कानावर आल्या की, तुम्हाला बुक केलं होतं, पण दुसऱ्या म्युझिक कंपनीने फंडिंग केलं आणि त्यांनी आपला संगीतकार आणला. त्यावर मी म्हणालो, ठीक आहे, मी आराम करेन आणि कुटुंबासोबत अधिक वेळ घालवेन.”

Follow Us
मुंबई-ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष! गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला
Dahi Handi 2026 | मुंबई-ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष! गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला; महिला गोविंदांचाही दमदार सहभाग
साडेतीन वर्षांच्या मुलीने आजीला सांगितलं अन् धक्कादायक प्रकार उघडकीस!
साडेतीन वर्षांच्या मुलीने आजीला सांगितलं अन् धक्कादायक प्रकार उघडकीस! स्कूल व्हॅनमध्ये...
मुंबईच्या गणेशोत्सवात DJ-लेझरला कायमची नो एन्ट्री! पोलीस आयुक्त देवेन
Mumbai DJ Ban | मुंबईच्या गणेशोत्सवात DJ-लेझरला कायमची नो एन्ट्री! पोलीस आयुक्त देवेन भारतींची मोठी घोषणा
मनसे नेत्याच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली
Dahi Handi in Mumbai | कालपर्यंत परवानगी, रात्री अचानक नकार! मनसे नेत्याच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली
परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना दिलासा!
परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! सारथी शिष्यवृत्तीवरील खर्च मर्यादेवर मोठा निर्णय
मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष
Thackeray Group Dahihandi | मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष बघाच
जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत आंदोलकांची मोठी गर्दी
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत मराठा आंदोलकांची मोठी गर्दी
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह बघाच
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह; मध्यरात्री बाळकृष्णाचा जन्मसोहळा, मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका