AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ulhas Bapat: एकनाथ शिंदेंची शिवसेना अपात्र ठरणार? चिन्ह, पक्ष चोरीबाबत पुन्हा ‘सुप्रीम’ सुनावणी; घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचा सर्वात मोठा दावा

Ulhas Bapat on Shivsena: गेल्या तीन वर्षांपासून शिवसेना नेमकी कुणाची या वादाला पुन्हा उकळी फुटली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होत आहे. त्यापूर्वी घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी मोठा दावा केला आहे. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचं लक्ष लगालं आहे. काय आहे त्यांचे मत?

Ulhas Bapat: एकनाथ शिंदेंची शिवसेना अपात्र ठरणार? चिन्ह, पक्ष चोरीबाबत पुन्हा 'सुप्रीम' सुनावणी; घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचा सर्वात मोठा दावा
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, शिवसेना, उल्हास बापटImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Jan 21, 2026 | 11:53 AM
Share

Ulhas Bapat on Shivsena: राज्यात 2019 पासून मोठे राजकीय भूकंप घडले. जे कधी स्वप्नात वाटलं नाही ते घडलं. गेल्या तीन वर्षांपासून शिवसेना नेमकी कुणाची यावर खल सुरू आहे. या जुन्या वादाला पुन्हा एकदा उकळी फुटली आहे. आज सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या घटनापीठासमोर याप्रकरणी सुनावणीला सुरुवात होत आहे. या सुनावणीकडे केवळ राज्याचंच नाही तर उभ्या देशाचं मोठं लक्ष लागलं आहे. कारण या निकालातून भविष्यातील अनेक राजकीय घाडमोडी आणि पक्षांतराची दिशा स्पष्ट होणार आहे. त्यापूर्वी घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी एक मोठं भाकीत केलं आहे. दरम्यान ताज्या अपडेटनुसार याविषयीची सुनावणी लांबणीवर पडली आहे.

शिंदेसेना अपात्र ठरणार?

शिवसेना नाव आणि चिन्हावर आज सुनावणी होत आहे. आज न्यायालयात याविषयीची चर्चा होणे अपेक्षित असल्याचे बापट म्हणाले. तर आपण राज्यघटनेत काय आहे याबाबत बापटांनी स्पष्ट केले. लोकशाहीमध्ये ज्या संस्थावर विश्वास असायला हवा तो कमी होत चालला आहे.स्पीकर पक्ष्याचे सदस्य असल्यासारखे वागतात. सुप्रीम कोर्टाने 3 वर्ष निर्णय देत नाहीये. त्यामुळे विश्वास कमी होतोय. पक्ष्यांतर कस करावं याच उत्तम उदाहरण महाराष्ट्रातून समोर आल्याचे टोला उल्हास बापट यांनी लगावला. मी पहिल्यापासून सांगतोय शिंदे सरकार पहिल्या दिवसापासून बेकायदेशीर आहे, असा दावा त्यांनी पुन्हा केला.

स्वतःचा निर्णय सुप्रीम कोर्ट बदलू शकते. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने असे केले आहे. एका निकालात स्वतःचाच निकाल फिरवला आहे. पक्ष्यांतर बंदीबाबत निर्णय सभापतीनी घायचा असतो. नार्वेकर यांनी 3 महिन्यात निर्णय घेणं आवश्यक होतं. मात्र 6 महिन्यात कोणताही निर्णय घेतला गेला नाही. या संपूर्ण प्रकरणात प्रक्रियेऐवजी न्याय महत्त्वाचा होता ही गोष्ट उल्हास बापट यांनी अधोरेखित केली. तर यापूर्वीच्या सरन्यायाधीशांनी तीन पळवाटा करून दिल्याचे म्हणणे बापटांनी मांडले.

शिंदे सेना अपात्र ठरणार?

उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री नेमयाला हवं होत. त्यानंतर त्यांनी पुन्हा राजीनामा दिला असतं तर ते न्यायसंगत धरल्या गेलं असतं, असे बापट यांनी स्पष्ट केलं.भारताची लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम सुप्रीम कोर्टाचे आहे. पक्ष चिन्ह कोणाला द्यायच याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे, पक्ष्याची घटना पाहून त्याप्रमाणे कोण काम करतेय, बहुमत कोणाला आहे याचा विचार करून निर्णय घेतला पाहिजे. शिंदेची मुदत संपली आहे, त्यामुळे ते आता अपात्र ठरत नाहीत, असा मोठा दावा उल्हास बापट यांनी केला. कारण गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी निवडणूक लढवली आणि ते जिंकले. पण फारतर याप्रकरणात पक्ष चिन्हाविषयीचा योग्य निर्णय होण्याचे संकेत त्यांनी दिले.

सरकारवर कोणताही परिणाम नाही

उद्धव ठाकरेच्या बाजूने निर्णय झाल्यास काय होईल हे त्यांनी स्पष्ट केले. आपण 15 वर्षांपूर्वी सुप्रीम कोर्ट काय निर्णय देईल हे सांगू शकत होतो. मात्र आता सांगू शकत नाही, कारण विश्वास राहिला नाही, असे ते म्हणाले.सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही.आपल्याकडे सभापती पक्ष्याचे काम करतात..राज्य घटनेची अपेक्षा सभापती यांनी अम्पायर म्हणून काम केल पाहिजे. जो निकाल येईल तो कायदा होईल. राजकीय उलथापालथ होईल, पण मी यावर बोलणार नाही, असे उल्हास बापट म्हणाले.

महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.