10 मुले जन्माला घाला, 13 लाख मिळवा; रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची धक्कादायक घोषणा

ज्या महिला दहा मुलांना जन्माला घालतील तसेच त्यांना जिवंत ठेवतील अशा मातांना 'मदर हिरोईन' असा अवॉर्ड दिला जाणार आहे. 'मदर हिरोईन' योजनेअंतर्गत या मातांना 13 लाख रुपये बक्षीस म्हणून दिले जाणार आहेत. रशियन फेडरेशनची नागरिक असलेल्या महिलांनाच या पुरस्काराचा लाभ मिळणार आहे. एखाद्या मातेने आपत्कालीन परिस्थितीत किंवा दहशतवादी हल्ल्यात आपले मूल गमावले, तरीही संबधीत महिला या पुरस्काराची पात्र असणार.

10 मुले जन्माला घाला, 13 लाख मिळवा; रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची धक्कादायक घोषणा
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 18, 2022 | 7:28 PM

मास्को : रशिया(Russia) आणि युक्रेन(Ukraine) यांच्यातील युद्ध अजूनही धमसतच आहे. मोठी फौज युद्धात उतरवूनही मनुष्यबळ कमीच पडत आहे. देशावर युद्ध संकट असतानाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन(Russian President Vladimir Putin) हे देशातील घटत्या लोकसंख्येमुळे चिंतेत आहेत. देशातील लोकसंख्या वाढवण्यासाठी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अत्यंत धक्कादायक अशी घोषणा केली आहे. 10 मुले जन्माला घाला आणि 13 लाख मिळवा अशी वादग्रस्त ऑफरच त्यांनी देशातील महिलांना दिली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे त्यांच्या चौफेर टीका होत आहेत. मात्र, ते त्यांच्या घोषणेवर ठाम आहेत.

का दिली दहा मुलांना जन्माला घालण्याची ऑफर

राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या सरकारने नवीन योजनाच जारी केली आहे. दहा मुलांना जन्म देऊन त्यांच्या संगोपणासाठी सरकार या मातांना 13.5 हजार पौंड म्हणजेच 13 लाख रुपये देणार असल्याचे नवीन सरकारी देशात म्हंटले आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे देशात लोकसंख्येचे संकट निर्माण झाले आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी पुतिन यांनी थेट महिलांना दहा मुलांना जन्माला घालण्याच्या बदल्यात भरमसाठ मोबदल्याची ऑफर दिली आहे.

दहा मुलांना जन्माला घालणाऱ्या महिलांना ‘मदर हिरोईन’ अवॉर्डने सन्मानित करणार

ज्या महिला दहा मुलांना जन्माला घालतील तसेच त्यांना जिवंत ठेवतील अशा मातांना ‘मदर हिरोईन’ असा अवॉर्ड दिला जाणार आहे. ‘मदर हिरोईन’ योजनेअंतर्गत या मातांना 13 लाख रुपये बक्षीस म्हणून दिले जाणार आहेत. रशियन फेडरेशनची नागरिक असलेल्या महिलांनाच या पुरस्काराचा लाभ मिळणार आहे. एखाद्या मातेने आपत्कालीन परिस्थितीत किंवा दहशतवादी हल्ल्यात आपले मूल गमावले, तरीही संबधीत महिला या पुरस्काराची पात्र असल्याचे सरकारी निर्देशात म्हंटले आहे.

कोरोनामुळे देशातील मृतांची संख्या चिंताजनक बनली. त्यातच युक्रेनसोबतच्या युद्धात आतापर्यंत 50 हजार रशियन सैनिक मारले गेले आहेत. कोरोना महामारी, नंतर ब्रिटनसोबतच्या युद्धामुळे रशियामध्ये लोकसंख्येचे संकट उभे राहिले आहे. याला सामोरे जाण्यासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी देशातील महिलांना ही अनोखी ऑफर दिली आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.