AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक अब्ज डॉलर द्या आणि देशाच्या सर्वात सुंदर मुलीशी लग्न लावा, युंगाडाच्या सैन्य प्रमुखाची तुर्कीकडे अजब मागणी

आफ्रीकेतील देश युगांडाच्या सैन्य दल प्रमुखाने तुर्कीकडे अजब मागणी केली आहे. तुर्कीने एक अब्ज डॉलरची रक्कम द्यावीच शिवाय देशातील सुंदर मुलीशी विवाह लावून द्यावा अशी मागणी युगांडाच्या सैन्य दलप्रमुख कॅनेरुगावा यांनी केली आहे.

एक अब्ज डॉलर द्या आणि देशाच्या सर्वात सुंदर मुलीशी लग्न लावा, युंगाडाच्या सैन्य प्रमुखाची तुर्कीकडे अजब मागणी
Uganda's army chief demand
| Updated on: Apr 13, 2026 | 11:22 PM
Share

आफ्रीकन देश युगांडाच्या सैन्य दल प्रमुख जनरल मुहूजी कॅनेरुगाबा यांनी तुर्कीकडे अजब मागणी केली आहे. पहिली मागणी १ अब्ज डॉलर म्हणजे ९ हजार कोटी रुपये द्यावेत आणि दुसरी मागणी तुर्कीतील सर्वात सुंदर मुलीशी लग्न लावून द्यावे. जर ३० दिवसात या मागण्या पूर्ण नाही केल्या तर तुर्कीतील दुतावास बंद केला जाईल. या अजब मागणीने सर्व जगात या जनरल मुहूजी कॅनेरुगाबा यांची चर्चा होत आहे. विशेष म्हणजे ११ एप्रिल रोजी कॅनेरुगाबा यांनी एक्सवर पोस्ट करुन ही मागणी केली आहे.

आफ्रीकन देश युगांडाचे सैन्य दल प्रमुख जनरल मुहूजी कॅनेरुगाबा यांनी तुर्कीकडे या अजब मागण्या केल्या आहेत. युगांडा गेल्या सुमारे २० वर्षांपासून सोमालियात अल-शबाब नावाच्या अतिरेकी संघटनांशी लढत आहे. ही संघटना अल-कायदाशी जोडलेली असून सोमालियात मोठा विध्वंस घडवत आहे. या दरम्यान, तुर्कीने सोमालियात मोठ-मोठी काम केली आहेत. तुर्कीने येथे रस्ते, बंदरे आणि विमानतळ बांधले आहेत आणि यातून खूप पैसा कमावला आहे.

कॅनेरुगाबा यांचे म्हणणे आहे की तुर्कीने सोमालियातून पैसे कमावले मात्र सुरक्षेची संपूर्ण बोझा युगांडावर पडला आहे. यामुळे तुर्कीने १ अब्ज डॉलर म्हणजे ८,५०० कोटी रुपये सुरक्षेचा हिस्सा म्हणून युगांडाला द्यायला हवेत असे कॅनेरुगाबा यांचे म्हणणे आहे.

जनरल कॅनेरुगाबा कोण आहेत ?

मुहूजी कॅनेरुगाबा युगांडाचे सैन्य दल प्रमुख आहेत. म्हणजे संपूर्ण सैन्याचे सर्वात मोठे अधिकारी. मात्र, त्यांची एक आणखी खास ओळख म्हणजे ते युगांडाच्या राष्ट्राध्यक्ष योवेरी मुसेवेनी यांचे पुत्र आहेत. त्यांना त्यांच्या वडीलांचा उत्ताधिकारी म्हणजे पुढील राष्ट्राध्यक्ष मानले जात आहे. ते सोशल मीडियावर खूप सक्रीय असतात आणि अजबगजब वक्तव्यांसाठी आधीपासूनच प्रसिद्ध आहेत.

लग्नाची मागणी का केली ?

१ अब्ज डॉलरच्या सोबत कॅनेरुगावा यांनी लिहिलीय की त्यांना तुर्कीच्या सर्वात सुंदर मुलीशी लग्न देखील करायचे आहे. त्यांनी लिहिलंय की ही त्यांची वैयक्तिक मागणी आहे.

३० दिवसात अटी पाळाव्यात

तुर्कीने ३० दिवसाच्या आत त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा युगांडा तुर्कीतील आपला दुतावास बंद करेल. याशिवाय तुर्कीच्या एअरलाईनला युगांडाच्या हवाई क्षेत्रातून जाण्यास परवानगी देखील नाकारण्यात येईल असेही या जनरलने म्हटले आहे.

Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?