
भारतावर भले अमेरिकेने 50 टक्के टॅरिफ लावला असेल, पण भारतीय अर्थव्यवस्थेच्या वेगावर अशा कुठल्याही अडथळ्याचा परिणाम होणार नाही. हे आम्ही बोलत नाहीय, तर ईवाई इंडियाच्या रिपोर्टमध्ये हा अंदाज वर्तवण्यात आलाय. यात म्हटलय की, भारत 2038 पर्यंत 34.2 ट्रिलियन डॉलरच्या सकल देशांतर्गत उत्पादनासह (पीपीपी) जगातील दुसरी मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो. भारतावरील टॅरिफचा दबाव आणि जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर ही कमाल करेल, असं EY इकोनॉमी वॉट ऑगस्ट 2025 मध्ये म्हटलय.
अनेक आव्हानांवर मात करुन भारताचा जगातील पहिल्या पाच मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये समावेश झालाय असं ईवाई इंडियाने म्हटलं आहे. मजबूत आर्थिक पायासह देश वेगाने पुढे जातोय. टॅरिफचा दबाव आणि मंदावलेला व्यापार या जागतिक अनिश्चिततेच्या काळातही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत आहे. याचं मुख्य कारण आहे देशांतर्गत डिमांड आणि आधुनिक टेक्नोलॉजीमधील प्रगती. येणाऱ्या पाच वर्षात 2030 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 20.7 ट्रिलियन डॉलर (पीपीपी) पर्यंत पोहोचेल असा रिपोर्टमध्ये अंदाज आहे.
चीनचा वेग काय असेल?
रिपोर्टनुसार, अमेरिका, चीन, जर्मनी आणि जापानच्या तुलनेत भारताची स्थिती चांगली आहे. चीन 2030 पर्यंत अंदाजित 42.2 ट्रिलियन डॉलर जीडीपीसह (पीपीपी) इकोनॉमीच्या रेसमध्ये सर्वात पुढे असेल. पण दुसरीकडे वृद्ध होत जाणारी लोकसंख्या आणि वाढतं कर्ज अशी आव्हान त्यांच्यासमोर येऊ शकतात.
भारताबद्दल काय खास ?
जर्मनी आणि जापान हे देश प्रगत आहे. पण जागतिक व्यापारावर ते मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. त्याचा परिणाम त्यांच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. बिलकुल या विरुद्ध रिपोर्ट भारताबद्दल आहे. भारतात युवा लोकसंख्या, देशांतर्गत वाढती डिमांड आणि टिकाऊ वित्तीय दृष्टीकोन याचं कॉम्बिनेशन, त्यामुळे लॉन्गटर्म ग्रोथला एक अनुकूल रस्ता उपलब्ध होतो असं रिपोर्टमध्ये म्हटलय.
पहिल्या पाच अर्थव्यवस्था कुठल्या?
रिपोर्टमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या तेजीच कौतुक करण्यात आलं आहे. सध्या जगात पाच मजबूत अर्थव्यवस्था आहेत. म्हणजे लोकांची खरेदी करण्याची चांगली क्षमता आहे. यात अमेरिका, चीन, जापान, भारत आणि जर्मनी हे देश आहेत. भारत चौथ्या स्थानावर आहे. पुढच्या तीन ते चार वर्षात भारत तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल. अमेरिका आजही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे.