AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांना अजून एक मोठा धक्का, भारत आणि चीनबद्दल अत्यंत मोठी बातमी, रविवारी…

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावल्यानंतर त्यांच्या विरोधात संतापाचे वातावरण हे बघायला मिळतंय. डोनाल्ड ट्रम्प हे भारताबद्दल भडकावू विधाने करताना दिसत आहेत. दुसरीकडे भारत आणि चीन अमेरिकेला धक्का देताना दिसत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना अजून एक मोठा धक्का, भारत आणि चीनबद्दल अत्यंत मोठी बातमी, रविवारी...
Donald Trump Prime Minister Narendra Modi
| Updated on: Aug 28, 2025 | 12:34 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सात वर्षामध्ये पहिल्यांदा चीनच्या दाैऱ्यावर जात आहेत. विशेष म्हणजे ते अशावेळी जात आहेत, ज्यावेळी अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. हेच नाही तर अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफच्या निर्णयात चीनने भारताची साथ दिलीये. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात रविवारी व्दिपक्षीय बैठक होण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदी हे शी जिनपिंग यांच्या निमंत्रणानंतर 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या एससीओ शिखर संमेलनात भाग घेणार आहेत.

या बैठकीत दोघांमध्ये टॅरिफबद्दल चर्चा होणार आहे. यादरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन हे देखील चीनमध्ये दाखल होऊ शकतात. अमेरिकेच्या विरोधात भारत, चीन आणि रशिया एकत्र येताना दिसत आहे. हा अत्यंत मोठा धक्का अमेरिकेला म्हणावा लागेल. अगोदर चर्चा होती की, चीनच्या दाैऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी जातील. मात्र, आता स्पष्ट झालंय. भारत, रशिया आणि चीन एकत्र येत असल्याने अमेरिकेने मोठा धसका घेतलाय.

हेच नाही तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या पार्श्वभूमीवर थेट नरेंद्र मोदी यांना चार वेळा फोन केला. मात्र, नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन घेतला नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारताला सातत्याने धमकी दिली जात आहे, हेच नाही तर रशियाकडून भारताने तेल खरेदी करणे बंद केले नाही तर वाईट परिणामांना भारताला आणखीन सामोरे जावे लागेल, असे अमेरिकेकडून सांगण्यात आलंय. मात्र, भारत हा अमेरिकेच्या दबावाला बळी पडताना दिसत नाहीये.

डोनाल्ड ट्रम्प सरकारने नुकताच सांगितले की, भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे बंद करावे. आम्ही त्यांच्यावरील 25 टक्के टॅरिफ कमी करण्यास तयार आहोत. पण आमची रशियाकडून तेल खरेदी न करण्याची अट त्यांना मान्य करावी लागेल. दुसरीकडे रशियाकडून तेल खरेदी करण्यामध्ये चीन सर्वात नंबर एकला आहे. मात्र, असे असतानाही चीनवर टॅरिफ न लावला फक्त भारतावर टॅरिफ लावण्यात आला आहे.

Follow Us
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?