मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांना दे धक्का, भारताचा मोठा डाव, नुकसान टाळण्यासाठी थेट…
भारत आणि अमेरिकेत टॅरिफच्या मुद्द्यावरून संबंध ताणले गेले आहेत. अनेक वर्षांपासूनचे चांगले संबंध वाईट वळणावर आहेत. हेच नाही तर भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चक्क डोनाल्ड ट्रम्प यांचे फोन उचलणेही बंद केले आहे.

अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लागून मोठा धक्का दिला. शेवटपर्यंत भारताने अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नाहीत आणि भारतावर शेवटी टॅरिफ लावण्याचा निर्णय घेण्यात आला. रशियाकडून तेल खरेदी भारत करत असल्यानेच आपण टॅरिफ लावत असल्याचे अमेरिकेकडून सांगण्यात आले. मात्र, टॅरिफबद्दल अमेरिकेची दुटप्पी भूमिका स्पष्ट दिसली. 50 टक्के टॅरिफ लावण्यात आल्याने भारतातून निर्यात होणाऱ्या मालावर थेट परिणाम होणार आहे. हेच नाही तर उद्योजकांनी मोठा निर्णय घेतल्याचे देखील कळतंय. निर्यातदारांनी यावर भाष्य केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरज, नोएडा आणि तिरुपूर येथील कापड आणि वस्त्र उत्पादकांनी उत्पादन थांबवले आहे. वियतनाम आणि बांगलादेशमधील कमी किंमतीच्या उत्पादकांपेक्षा मागे आहोत. टॅरिफचा परिणाम हा सीफूड मार्केटवर विशेषतः कोळंबीवर मोठा परिणाम होऊ शकतो. नवीन टॅरिफमुळे सीफूड पुरवठा ठप्प होण्याची शक्यता आहे. आता या सर्वांमधून मार्ग काढण्यासाठी भारत सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत.
अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर 70 टक्के निर्यात कमी होणार हे स्पष्टच आहे. आता हे नुकसान कसे भरून काढायचे याकरिता सरकारमध्ये उच्चस्तरीय बैठका होत आहेत. याबद्दल बोलताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, सरकार निर्यातीला प्रोत्साहन देत आहे आणि अभियान आणि विशेष आर्थिक क्षेत्र सुधारणांसारख्या प्रस्तावांवर विचार करत आहे. भारताने युरोपियन युनियन, युनायटेड किंग्डम, युरेशियन इकॉनॉमिक युनियन आणि पूर्व आशियावर आपले लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे.
दुसरीकडे भारताला रशियासोबतच्या चांगल्या संबंधांचा फायदा देखील होण्याची शक्यता आहे. रशियाकडून हे अगोदरच स्पष्ट करण्यात आले की, आम्ही भारताच्या वस्तूंची आमच्या बाजारपेठेत स्वागत करू. व्यापाऱ्यांनी सध्या उत्पन्न बंद केले असले तरीही भारताला निर्यात वाढवण्यासाठी पर्याय शोधावाच लागणार आहे. कारण मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचे चिन्ह आहे. दुसरीकडे भारतावर टॅरिफ लावल्याने अमेरिकेचे देखील नुकसान होताना दिसत आहे. अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावल्यानंतर भारत हा चीनसोबत हातमिळवणी करताना सध्या दिसत आहे. मोदी हे लवकरच चीनच्या दाैऱ्यावर जाणार आहेत.
