टॅरिफचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांना भोवला, फक्त भारतच नाही तर अमेरिकेलाही दणका
टॅरिफवरून मागील काही दिवसात तणाव बघायला मिळत होता. शेवटी अमेरिकेकडून 50 टक्के टॅरिफ हा भारतावर लावण्यात आला आहे. मात्र, यामध्ये फक्त भारतच नाही तर अमेरिकेचेही मोठे नुकसान होतंय. अनेक घडामोडींना चांगलाच वेग आल्याचे बघायला मिळतंय.

मोठ्या वादानंतर भारतावर अमेरिकेने 50 टक्के टॅरिफ लावला आहे. रशियाकडून भारत तेल खरेदी करत असल्यानेच आपण टॅरिफ लावल्याचा दावा त्यांनी केला. हेच नाही तर अनेक देशांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका करत म्हटले की, ट्रम्प हे अर्थव्यवस्थेला हत्यार बनवत आहेत. रशियाकडून सर्वात जास्त तेल खरेदी करणाऱ्या चीनवर कोणत्याही प्रकारचा टॅरिफ हा अमेरिकेकडून लावण्यात आला नाहीये. मात्र, भारताने अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नाहीत आणि रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली आहे. शिवाय काही महत्वाचे करार देखील केली आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना आता जोरदार धक्का बसलाय.
भारतावर टॅरिफ लावल्याने फक्त भारताचेच नुकसान होणार नाही तर अमेरिकेचेही नुकसान होतंय. हळूहळू करून अमेरिकेच्या बाजारपेठेतील भारतीय वस्तू गायब होतील. कारण भारतातून अमेरिकेमध्ये जाणाऱ्या वस्तूंवरील नफा कमी होणार आहे. इतका मोठा टॅरिफ लावल्याने वस्तूंच्या किंमतीमध्येही वाढ होणार आहे. भारताकडून अमेरिकेत तब्बल 86 अरब डालरची निर्यात केली जाते. आता ती 70 टक्के निर्यात कमी होणार आहे.
शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच स्वदेशी वस्तू अधिक प्रमाणात वापरण्याचा नारा देशातील जनतेला दिला आहे. यासोबतच भारतात तयार होणाऱ्या वस्तूंना आता सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रमोट केले जाणार आहे. कारण ज्याप्रकारे अमेरिकेने भारताच्या वस्तूंवर टॅरिफ लावला आहे, त्यामुळे नफा फार कमी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे थेट त्याचा निर्यातीवर परिणाम होणार आहे. या वस्तू भारतीय बाजारपेठेत आणि इतर देशांच्या बाजारपेठेत अधिक दिसणार आहेत.
हेच नाही तर भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतर रशियाने स्पष्ट केले की, आम्ही आमच्या बाजारपेठेत भारतीय वस्तूंचे मोठ्या प्रमाणात स्वागत करू. भारतीय वस्तूंची आयात कमी झाल्याने अमेरिकेला देखील दणका मिळालाय. हेच नाही तर भारतीय बाजारपेठेत अनेक अमेरिकन कंपन्या गेल्या कित्येक वर्षापासून मोठी उलाढाल करत आहेत. अशा कंपन्यांवर देखील थेट कारवाई होऊ शकते आणि याचा परिणाम थेट अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे.
