
अमेरिका आणि युरोपात ग्रीनलँडवरुन फूट पडली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची वक्रदृष्टी ग्रीनलँडवर पडल्याने दुसरीकडे फ्रान्स, इटली आणि जर्मनी यांची रशियाशी जवळीक वाढण्याचे संकेत मिळाले आहेत. जर जगातील सर्वात मोठी सैन्य शक्ती अमेरिका एका बाजूला आणि दुसरीकडे अशक्यप्राय वाटणारे रशिया आणि युरोप यांची आघाडी झाली तर जगात काय होईल ? ज्यात अमेरिका आणि तुर्की वगळून NATO चे इतर देश जर एकटवले तर तर कोणाची ताकद जास्त असेल . अनेक अब्ज डॉलरचे डिफेन्स बजेट असलेला अमेरिका आणि विघटनानंतर कमकूवत झालेल्या रशिया आणि इतर नाटो देशांचा मुकाबला करु शकेल का ? पाहूयात कोणात किती ताकद ? अमेरिका हा जगातील सर्वात मोठी आर्थिक शक्ती असलेला पॉवरफूल देश आहे. आकाशातील युद्धात अमेरिकेस बरोबरी करणारा कोणताही देश सध्या पृथ्वीतलावर नाही. हजारो फायटर विमाने आणि अणू इंधनावर चालणाऱ्या विमान नौकाचा ताफा पदरी...