AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेचे एजंट असल्याचं सागंत आले, थेट राष्ट्रपतींवर गोळ्या झाडत हत्या, राष्ट्रपती भवनात थरार

कॅरेबियन देश हैतीचे राष्ट्रपती जोवेनल मोसे यांची त्यांच्या राहत्या घरी हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चार संशयास्पद आरोपींना सुरक्षा दलांनी ठार केलं असून दोन जणांना ताब्यात घेतलं आहे.

अमेरिकेचे एजंट असल्याचं सागंत आले, थेट राष्ट्रपतींवर गोळ्या झाडत हत्या, राष्ट्रपती भवनात थरार
jovenel moise
| Edited By: | Updated on: Jul 08, 2021 | 3:32 PM
Share

नवी दिल्ली: कॅरेबियन देश हैतीचे राष्ट्रपती जोवेनल मोसे यांची त्यांच्या राहत्या घरी हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चार संशयास्पद आरोपींना सुरक्षा दलांनी ठार केलं असून दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. पोलीस प्रमुख लिओन चार्ल्स यांनी इतर हल्लेखोरांना ताब्यात घेतले जाईल, अशी माहिती दिली. मोसे यांचं वय 53 वर्ष होतं. बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार हैतीची राजधानी पोर्ट-अऊ-प्रिन्स येथे राष्ट्रपती निवासामध्ये दुपारी 1 च्या सुमारास काही अज्ञात बंदूकधारी व्यक्तींनी त्यांची गोळी मारून हत्या केली. राष्ट्रपती जोवेनल मोसे यांच्या पत्नी मार्टिन मोसे यादेखील जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारांसाठी फ्लोरिडाला हलवले जात असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आलं आहे.( Haiti President Jovenel Moise Murder by Gangsters at President House)

चार हल्लेखोर ठार

पोलीस प्रमुख चार्ल्स यांनी बुधवारी दूरचित्रवाणीवरून देशाला संबोधन केलं. राष्ट्रपतींना मारणाऱ्या चार हल्लेखोरांना ठार करण्यात आलं असून दोघांना ताब्यात घेतलं असल्याची त्यांनी माहिती दिली. ज्या तीन पोलिसांना ओलीस ठेवण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. हल्लेखोर राष्ट्रपतींच्या घरातून बाहेर निघाल्यानंतर रस्त्यामध्ये पोलिसांशी त्यांचं चकमक झाली होती.

राजीनाम्याची मागणी

मोसे 2017 मध्ये हैती देशाचे राष्ट्रपती बनले होते. सध्या त्यांच्या राजीनाम्यासाठी देशांमध्ये विरोध प्रदर्शन देखील झाली होती. राजकीय अस्थिरता, गटबाजी ,हिंसा प्राकृतिक संकट यामुळे हा देश गरीब देशांच्या यादीमध्ये आहे.

देशात आणीबाणी

देशाचे अंतरिम प्रधानमंत्री क्लॉड जोसेफ यांनी देशात आणीबाणी लागू केली आहे. जोसेफ यांनी हल्लेखोर परदेशी असून ते इंग्रजी आणि स्पॅनिश भाषा जाणणारे होते असं म्हटलं. हैतीची अधिकृत भाषा क्रेओल आणि फ्रेंच आहे. काही माध्यमांनी दिलेल्या रिपोर्टनुसार हल्लेखोर काळ्या रंगाचे कपडे घालून आले होते आणि अमेरिकी ड्रग एन्फोर्समेंट एजन्सी मधील प्रतिनिधी असल्याचा त्यांनी दावा केला होता. मात्र, यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

अमेरिकेचे हैती येथील राजदूत एडमंड यांनी सांगितलं की अमेरिकी ड्रग एजंटनी राष्ट्रपतींना मारलं अशी घटना घडलेली नाही. हा हल्ला सुपारी देऊन करण्यात आला होता. एडमंड यांनी नंतर वृत्तसंस्था रॉयटर्स ला दिलेल्या माहितीनुसार ज्यावेळी हल्लेखोर राष्ट्रपतींच्या घरात घुसले त्यावेळेस त्यांनी स्वतःला अमेरिकेचे एजंट असल्याचं सांगितलं असावं, असं म्हटलं. राष्ट्रपती मोसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. या वर्षीच्या सुरुवातीला राजधानी आणि इतर शहरांमध्ये यांच्या विरोधात प्रदर्शन, आंदोलन देखील करण्यात आलं होतं. ऑक्टोबर 2019 मध्ये देशामध्ये निवडणुका होण्याची अपेक्षा होती मात्र गदारोळामुळे निवडणुका लांबणीवर गेल्या होत्या. यावर्षी फेब्रुवारीमध्ये विरोधकांनी मोसे यांना पद सोडण्याची मागणी केली होती, त्या दिवशी देखील त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र तो अयशस्वी ठरला. देशाची लोकसंख्या 1.1 करोड असून 60 टक्के लोक गरिबी रेषेच्या खाली आहेत. 2010 साली आलेल्या भूकंपामध्ये हा देशातील दोन लाख लोकांनी जीव गमावला होता.

इतर बातम्या

अमेरिकेच्या अभ्यासातून आनंदाची बातमी; फायझर आणि मॉडर्नाची लस कोरोनावर 91 टक्के प्रभावी

जर्मनीमध्ये सापडला जगातील सर्वात जुना दागिना; 51 हजार वर्षांपूर्वी निएंडरथल करायचे वापर

Haiti President Jovenel Moise Murder by Gangsters at President House

मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.