AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठ यश ! अखेर हा देश झुकलाच..

Donald Trump : अमेरिकेचे राष्टाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चांगलेच आक्रमक झाले होते, त्यांनी हमासला थेट अल्टिमेटम दिलं होतं.. प्रस्तावित शांति करार रविवारपर्यंत स्वीकारला नाही तर कठोर परिणाम भोगावे लागतील, अशी थेट धमकीच ट्रम्प यांनी दिली होती.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठ यश ! अखेर हा देश झुकलाच..
डोनाल्ड ट्रम यांचे प्रयत्न यशस्वी
| Updated on: Oct 04, 2025 | 7:28 AM
Share

अमेरिकेचे राष्टाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नोबेल पुरस्कारासाठी जंग जंग पछाडताना दिसत आहे. पीसमेकर बनण्याची त्यांची इच्छा असून इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी ट्रम्प यांनी नुकताच पुढाकार घेतला होता. या दोघांमध्येही समेट घडवून आणण्यासाठी ट्रम्प यांनी एक शांती करार समोर आणला होता. त्यांनी ही 20 कलमी शांती योजना समोर आणली, त्यावर इस्रायलने सहमती दर्शवली मात्र हमासने त्यावर काहीच उत्तर दिलं नव्हत. अखेर ट्रम्प यांनी आक्रमक भूमिका घेत हमासला थेट अल्टिमेटम दिलं होतं. डोनाल्ड ट्रम्प यांनी आता हमासला 48 तासांचे अल्टिमेटम दिले आहे. या काळात शांतता कराराला नाकारल्यास त्याचे कठोर परिणाम भोगावे लागतील, अशी थेट धमकीच ट्रम्प यांनी दिली.

अखेर ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर हमासने सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. ते ओलिसांच्या सुटकेवर आणि इतर अटींवर तपशीलवार चर्चा करण्यासाठी मध्यस्थी चर्चेत सहभागी होण्यास तयार आहेत असे संकेत हमासने दिले. हमासने म्हटले आहे की त्यांनी गाझा पट्टीतील युद्ध संपवण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या योजनेचे काही भाग स्वीकारले आहेत, ज्यामध्ये सत्ता सोडणे आणि उर्वरित सर्व ओलिसांची सुटका करणे समाविष्ट आहे. मात्र इतर काही पैलूंवर पॅलेस्टिनींशी पुढील चर्चा आवश्यक आहे.

7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला करून युद्ध सुरू झाल्यानंतर जवळजवळ दोन वर्षांनी मोठ्या लष्करी हल्ल्याचा धोका वाढला होता. रविवारी संध्याकाळपर्यंत हमासला शांती करारावर सहमती द्यावी लागेल अन्यथा कठोर परिणा होतील असा इशारा ट्रमप यांनी दिला, त्यानंतर अवघ्या काही तासांतच हे विधान आले. तथापि, अमेरिका आणि इस्रायल आंशिक मंजुरीवर कशी प्रतिक्रिया देतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ट्रम्प यांचे अल्टिमेटम

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच स्पष्टपणे सांगितले होते की जर हमासने रविवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत गाझा पट्टीसाठी प्रस्तावित शांतता करारावर सहमती दर्शवली नाही तर अतिरेकी गटाला अधिक हल्ल्यांना सामोरे जावे लागेल. येत्या 7 ऑक्टोबर रोजी इस्रायल-हमास युद्धाच्या दोन वर्षांच्या वर्धापन दिनापूर्वी लढाई संपवण्याचे आणि डझनभर ओलिसांना परत आणण्याचे आश्वासन पूर्ण करण्याचा ट्रम्प यांचा दृढनिश्चय असल्याचे दिसून येत आहे.

अखेर गाझा पट्टीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी सादर केलेल्या योजनेचा इस्रायलने स्वीकार केला आहे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याचे स्वागत झाले आहे. पणकाही पैलूंवर पुढील वाटाघाटींची आवश्यकता आहे, असे इजिप्त आणि कतार सारख्या प्रमुख मध्यस्थांनी आणि हमासच्या एका शीर्ष नेत्याने म्हटले. असे असले तरी त्यांनी तपशीलवार माहिती दिली नाही.

पश्चिम आशियात नांदेल शांतता

रविवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत (वॉशिंग्टन, डी.सी. वेळेनुसार) हमाससोबत करार झाला पाहिजे असे ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले होते. “प्रत्येक देशाने स्वाक्षरी केली आहे!” जर तडजोडीची ही शेवटची संधी अपयशी ठरली तर हमासला अभूतपूर्व विनाशाचा सामना करावा लागेल. कोणत्या ना कोणत्या मार्गाने पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होईल, असेही त्यांनी लिहीलं होतं.

गाझा पट्टीतील युद्ध संपवण्यासाठी योजना सादर

या आठवड्याच्या सुरुवातीला इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ट्रम्प यांनी गाझा पट्टीतील युद्ध संपवण्याची योजना सादर केली. या योजनेअंतर्गत, इस्रायल आणि हमास यांच्यात सहमती झाल्यानंतर लगेचच युद्ध संपेल आणि हमास इस्रायली ओलिसांना (जिवंत आणि मृत दोन्ही) सोडेल, तर इस्रायल पॅलेस्टिनी कैद्यांना सोडेल.

ट्रम्प यांचा गाझा पीस प्लान काय ?

याअंतर्गत, शांततापूर्ण सहअस्तित्व स्वीकारणाऱ्या आणि शस्त्रे समर्पण करणाऱ्या हमास सदस्यांना माफी दिली जाईल, तर गाझा सोडू इच्छिणाऱ्यांना सुरक्षित मार्ग दिला जाईल. या करारामुळे गाझाला ताबडतोब संपूर्ण मानवतावादी मदत पाठवली जाईल, ज्यामध्ये पायाभूत सुविधांच्या पुनर्बांधणीचा समावेश असेल. कोणालाही गाझा सोडण्यास भाग पाडले जाणार नाही आणि जे लोक निघून जाऊ इच्छितात किंवा परत येऊ इच्छितात त्यांना तसे करण्याची परवानगी दिली जाईल.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.