हिटलरच्या घराचे आता पोलीस ठाण्यात रुपांतर होणार, मानवाधिकाराचे प्रशिक्षण दिले जाणार

| Updated on: May 29, 2023 | 3:04 PM

हुकूमशहा हिटलरचा जन्म जेथे झाला ते निवासस्थान आता ऑस्ट्रीया सरकारने सात कोटीला विकत घेतले असून तेथे पोलीस ठाणे उभारण्यात येत आहे. हिटलरने ज्यू लोकांवर अमानवीय अत्याचार केले. आता या घरात मानवाधिकाराचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

हिटलरच्या घराचे आता पोलीस ठाण्यात रुपांतर होणार, मानवाधिकाराचे प्रशिक्षण दिले जाणार
adolf hitler
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : जर्मन सीमेजवळील ब्रोनाऊ येथे सतराव्या शतकात जर्मनीचा हुकूमशहा हिटलर ( adolf hitler ) जेथे रहात होता, ते घर आता पोलीस स्टेशन ( Police Station ) आणि मानवाधिकार प्रशिक्षण केंद्र ( Human Rights Education ) होणार आहे. 20 एप्रिल 1889 मध्ये घराच्या वरच्या मजल्यावर भाड्याच्या खोलीत हिटलरचा जन्म झाला होता. तीन वर्षे येथे राहील्यानंतर हे भाड्याचे घर असल्याने हिटलरच्या पालकांनी हे घर सोडले. साल 2016 मध्ये खूपच वादविवाद झाल्यानंतर ऑस्ट्रीया सरकारने अखेर या इमारतीलाच विकत घेतले. आता तेथे पोलीस ठाणे बनणार आहे.

साल 2016 मध्ये सरकारने हिटलरच्या घरासंदर्भात एका समितीची स्थापना केली होती. या समितीने या घरात हिटलरचा जन्म झाला असल्याने ते न तोडता त्याचे जतन केले जावे अशी शिफारस केली. त्यावेळी हिटलरच्या या घराला तोडू नये यासाठी खूप मोठे आंदोलन झाले. देशाच्या अनेक नेते आणि नागरिकांनी हे घर तोडू नये असे सांगितले. त्यामुळे या देशात झालेल्या मोठ्या घटनेचा इतिहास कायमचा पुसला जाईल असे त्यांनी म्हटले होते. पुढच्या पिढीसाठी हा इतिहास जतन केला जावा असे लोकांचे म्हणणे होते.

नाझी समर्थकांचे केंद्र बनले

दुसऱ्या जागतिक महायुद्धा दरम्यान या इमारतीला नाझींनी धार्मिक केंद्रात बदलले होते. नाझी समर्थक येथे पर्यटक म्हणून समुहाने भेट द्यायचे. साल 1944 मध्ये युद्धाच्या शेवटी परिस्थिती पालटून गेली. हिटलर जन्मलेल्या या इमारतीचा मालकी हक्क जेर्लिंडे पोमर नावाच्या महिलेकडे होता. साल 1972 मध्ये सरकारने याला भाड्यावर घेतले. यात अपंग लोकांसाठी केंद्र चालविले जात होते. जे साल 2011 मध्ये बंद झाले. त्यानंतर ही इमारत रिकामी आहे.

1940 च्या दशकात हिटलरच्या घराला नाझी टुरिस्ट बनून भेट द्यायचे…

1940 च्या दशकात हिटलरच्या घराला नाझी पर्यटक म्हणून भेट द्यायचे..

ऑस्ट्रीया सरकारने घर खरेदी केले

साल 2011 मध्ये सरकारने ही इमारत खरेदी करण्याची ऑफर दिली. परंतू जेर्लिंडे पोमर या महिलेने दाद दिली नाही. या इमारतीत अनेकवेळा नाझींची मेळा भरायचा. ज्यामुळे सरकारला हे रोखण्यासाठी ही इमारत खरेदी करावी लागली. साल 2016 मध्ये सरकारने या महिलेला सात कोटी रूपये देऊन ही इमारत खरेदी केली. आता साल 2025 पर्यंत येथे पोलीस ठाणे तयार केले जाणार आहे.

पहिल्या जागतिक महायुद्धात लढला

जर्मनीच्या मुनिच शहरात 24 वर्षांचा असताना साल 1913 मध्ये हिटलर पहिल्या जागतिक युद्धात राजाच्या परवानगीने हिटलर युद्धात जर्मनीच्या बाजूने उतरला. परंतू जर्मनीचा पराभव झाला. स्वत:च्या नागरीकांनी देशभक्ती न दाखविल्यामुळे जर्मनी हरला असा हिटलरचा समज होता. त्यामुळे हिटलरच्या उभारणीसाठी हीच पार्श्वभूमी उपयोगी ठरल्याचे म्हटले जाते.