जग हादरलं… होर्मुजमध्ये मालवाहक जहाजाचा स्फोट; 2500 कंटेनरला जलसमाधी; VIDEO व्हायरल

होर्मुज सामुद्रधुनीमध्ये एका मालवाहू जहाजाला भीषण स्फोटामुळे जलसमाधी मिळाली. सागरी सुरुंगाला धडकल्याने इराणने रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्सच्या नौदलाने ही घटना घडल्याचे सांगितले. या दुर्घटनेत 2500 कंटेनर समुद्रात बुडाले, ज्यामुळे जागतिक पुरवठा साखळीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाले असून, जहाजाची आणि चालक दलाची माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे.

जग हादरलं... होर्मुजमध्ये मालवाहक जहाजाचा स्फोट; 2500 कंटेनरला जलसमाधी; VIDEO व्हायरल
Hormuz Strait Ship Explosion
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 14, 2026 | 10:23 PM

स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून एक मोठी घटना समोर आली आहे. सागरी सुरुंगाला धडकल्याने झालेल्या स्फोटामुळे 2500 कंटेनर घेऊन जाणाऱ्या एका मालवाहतूक जहाजाला जलसमाधी मिळाली आहे. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्सच्या नौदलाने आज जहाज बुडाल्याची माहिती दिली. इराणच्या मते, हे जहाज सागरी सुरुंगाला धडकलं. त्यामुळे जहाजाला भीषण आग लागली. त्यानंतर हे जहाज समुद्रात बुडालं. युद्धानंतर पहिल्यांदाच अशा प्रकारच्या दुर्घटनेला इराणने पुष्टी दिली आहे. या जहाजासोबत 2500 कंटेनर समुद्रात बुडाल्याने हाहा:कार उडाला आहे.

या दुर्घटनेशी संबंधित अनेक फोटो आणि व्हिडीओ लोक एक्सवर शेअर करत आहेत. यात कंटेनरने भरलेल्या जहाजातून धुराचे लोटचे लोट बाहेर पडताना दिसत आहेत. त्यानंतर हळूहळू हे जहाज समुद्रात विलिन होताना दिसत आहे. थोड्यावेळाने कंटेनर समुद्रात तरंगताना दिसत आहेत. हे चित्र अत्यंत धक्कादायक आणि भयावह वाटत आहे. दरम्यान, या घटनेशी संबंधित काहीही माहिती कुणी दिलेली नाही. हे जहाज कोणत्या देशाचं होतं? या जहाजात किती लोक होते? चालकाचं काय झालं? कंटेनरमध्ये काय होतं? किती नुकसान झालं? आदी कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही.

Loading...

 

आधी आग लागली अन् मग…

इराणच्या सरकारी दूरचित्र वाहिनीने रिव्होल्यूशनरी गार्डच्या हवाल्याने या दुर्घटनेची माहिती दिली आहे. बुधवारी हे जहाज सागरी सुरुंगांना धडकलं आणि त्यामुळे जहाजाला प्रचंड भीषण आग लागली. त्यामुळे हे जहाज बुडालं. अवैध आणि खतरनाक मार्गाने हे जहाज चाललं होतं. धडकेनंतर आग लागल्याने जहाजासोबत त्यावरील 2500 कंटेनरही बुडाले, असं वृत्त इराणी टीव्हीने दिलं आहे.

इराणने होर्मुजवर कंट्रोल कायम ठेवण्यासाठी समुद्राच्या तळाला लँड माइन पुरून ठेवले आहेत. त्यामुळे जर एखादं अनधिकृत जहाज या मार्गाने गेलं तर वॉटर माइनच्या संपर्कात येऊन दुर्घटना होण्याची शक्यता असते. दरम्यान, कंटेनरमध्ये काय सामान होतं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. जहाजाला आग लागल्यानंतर ही आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला की नाही याचीही माहिती देण्यात आलेली नाही. तसेच चालकदलाबाबतचीही कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही.

 

पुरवठा साखळीवर परिणाम

होर्मुज स्ट्रेट वैश्विक व्यापार आणि ऊर्जा पुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग आहे. फारस खाडीला अरबी समुद्राशी जोडणारा हा निमुळता मार्ग तेल आणि गॅसच्या आंतरराष्ट्रीय सप्लायसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या ठिकाणी सैन्य कारवाई झाल्याने जहाजांचे दळणवळण आणि ग्लोबल पुरवठा साखळीवर त्याचा परिणाम झाला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us