AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिजीत दीपकेंना सर्वात मोठा झटका, एससी असूनही अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल; मोठी खळबळ

अभिजीत दीपके यांच्यासह पत्रकार रोजी, गजेंद्र सिंह आणि अन्य काही जणांवर दिल्लीत ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत एफआयआर दाखल झाला आहे. एसीपी विवेक भगत यांच्या तक्रारीनुसार, जंतरमंतर येथे जातीय टिप्पणी, सार्वजनिक अपमान आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप आहे. सोशल मीडियावर प्रतिमा मलिन केल्याचाही ठपका आहे. खुद्द एससी असूनही दीपके यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

अभिजीत दीपकेंना सर्वात मोठा झटका, एससी असूनही अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल; मोठी खळबळ
Abhijeet DipkeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 14, 2026 | 9:46 PM
Share

दिल्लीचे एसीपी विवेक भगत यांच्या तक्रारीनंतर मुक्त पत्रकार रोजी, गजेंद्र सिंह आणि सीजेपीच्या काही सदस्यांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. काल 13 ऑक्टोबर रोजी संसद मार्ग पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जातीसूचक वक्तव्य करणं, सार्वजनिक ठिकाणी अपमानित करणं, सरकारी कामात व्यत्यय आणणं आणि सोशल मीडियावर कथितपणे प्रतिमा मलिन करण्याचा आरोप या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे अभिजीत दीपकेंवरही अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

विवेक भगत यांच्या तक्रारीनुसार, 3 ऑक्टोबर 2026 रोजी ते जंतरमंतरवर निवडणूक आयोगाच्या विरोधात होणाऱ्या आंदोलनाच्या ड्युटीवर होते. यावेळी बुटा सिंग चौकात मुक्त पत्रकार रोजीने कथितपणे त्यांना जातीवरून (मेघवाल समाज) अपमानजनक विधान केलं. तसेच त्यांच्या पदावर नियुक्त राहण्यावरून सवाल केले. मात्र, मी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि माझं काम करत राहिलो, असं भगत यांचं म्हणणं आहे.

लैंगिक छळाचा आरोप

दुपारी 3 वाजता आंदोलकांना सांभाळताना आणि ताब्यात घेताना रोजीने माझ्यावर लैंगिक छळाचा आरोप केला. रोजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मला वारंवार त्रास दिला. त्यामुळे सरकारी कामात व्यत्यय आला. त्याच संध्याकाळी रोजी आणि अन्य लोकांनी संसद मार्ग पोलीस ठाण्याच्या बाहेर निदर्शने केली. माझ्याविरोधात घोषणाबाजी केली. यौन दरिंदा आणि संभावित बलात्कारी अशा घोषणाही माझ्या विरोधात देण्यात आल्या, असा आरोप भगत यांनी या तक्रारीत केला आहे.

या लोकांची नावे

रोजी, गजेंद्र सिंह आणि सीजेपीच्या काही सदस्यांनी माझ्याविरोधात करण्यात आलेल्या आरोपाशी संबंधित पोस्ट आणि रील सोशल मीडियावर व्हायरल केली, असा आरोपही विवेक भगत यांनी केला आहे. भगत यांनी त्यांच्या तक्रारीत रोजी, गजेंद्र सिंह, अभिजीत दीपके, आशुतोष रांका, सौरव दास आणि रत्ना सिंह यांची नावे नोंदवली आहेत. तक्रारीनुसार, संबंधित पोस्ट आणि रील एक्स तसेच इन्स्टाग्रामवरून व्हायरल करण्यात आली आहे. या प्रकारामुळे मला मानसिक त्रास झाला असून माझी सामाजिक तसेच व्यावसायिक प्रतिमा मलिन झाली आहे, असा दावाही भगत यांनी केला आहे.

काय लावली कलमं

तक्रारीच्या आधारे एफआयआरमधील आरोपांच्या अनुषंगाने संबंधित कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. तक्रारीनुसार, यात एससी एसटी अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत जातीसूचक टिप्पणी आणि अपमानासंबंधातील आरोप आहेत. तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम 221, कलम 356(2) आणि कलम 3(5) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

रोजीकडून करण्यात आलेली लैंगिक छळाची तक्रार दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचकडे पाठवण्यात आली होती. त्याची चौकशी सुरू आहे. तक्रारीत करण्यात आलेल्या आरोपांची सत्यता चौकशीचा विषय आहे. एफआयआरमध्ये केवळ नाव आल्याने गुन्हा सिद्ध होत नाही, असं एसीपीने म्हटलं आहे.

Follow Us
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप