युद्धात सर्वात मोठा निर्णय, लाल सागरात इस्त्रायलला…हुथी बंडखोरांच्या भूमिकेने जगात मोठी खळबळ!

इस्त्रायलनेदेखील हुथी बंडखोरांनी आमच्यावर हल्ला केल्याचे मान्य केले आहे. येमेन येथून इस्त्रायलच्या दिशेने क्षेपणास्त्र डागण्यात आले, असे इस्रायलने सांगितले आहे. तसेच आमची हवाई संरक्षण प्रणाली सक्रिय आहे. येणाऱ्या संभाव्य धोक्यांना परतवून लावण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, असे इस्त्रायलच्या लष्कराने सांगितले आहे.

युद्धात सर्वात मोठा निर्णय, लाल सागरात इस्त्रायलला...हुथी बंडखोरांच्या भूमिकेने जगात मोठी खळबळ!
israel ship and red sea
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 08, 2026 | 5:17 PM

Iran And Israel War : एकीकडे अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धबंदीवर चर्चा सुरू असताना दुसरीकडे आता इराण आणि इस्त्रायल यांच्यात मोठा संघर्ष उफाळून आला आहे. इस्त्रायलकडून लेबनॉनवर सतत हल्ले केले जात असल्याने इराणने इस्त्रायलवर हल्ला केला. त्यानंतर इस्त्रायलनेही इराणच्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणी हवाई हल्ले केले. या घटनेनंतर आता दोन्ही देशांत मोठे युद्ध पेटले आहे. असे असतानाच आता हुथी बंडखोरांनीही कंबर कसली असून लाल समुद्राबाबत मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर आता इस्त्रायलची मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे.

हुथी बंडखोरांनी केली मोठी घोषणा

मध्य पूर्वेत तणाव वाढल्यानंतर आता इराणचे समर्थन असलेल्या हुथी बंडखोरांनी मोठा निर्णय घेतला आहे. सोमवारी हुथी बंडखोरांनी इस्रायलवर क्षेपणास्त्र डागल्याचे सांगत त्या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. तसेच लाल समुद्रात यापुढे इस्त्रायली जाहाजांना येण्यास पूर्णपणे प्रतिबंध असेल, अशी घोषणाच करून टाकली आहे. जागतिक व्यापारासाठी लाल समुद्र हा सागरी मार्ग खूप महत्त्वाचा मानला जातो. परंतु आता हुथी बंडखोरांच्या या घोषणेनंतर सागरी मार्गावरही संकट निर्माण झाले आहे. इस्त्रायली जाहाजांना लाल सागरात पूर्णपणे बंदी असेल. शत्रू राष्ट्राने या नियमाचे उल्लंघन केल्यास आम्ही तो प्रयत्न हाणून पाडण्यासाठी लष्करी कारवाई करू, असा इशाराही हुथी बंडखोरांनी दिला आहे.

नवा संघर्ष आला उफाळून

दुसरीकडे इस्त्रायलनेदेखील हुथी बंडखोरांनी आमच्यावर हल्ला केल्याचे मान्य केले आहे. येमेन येथून इस्त्रायलच्या दिशेने क्षेपणास्त्र डागण्यात आले, असे इस्रायलने सांगितले आहे. तसेच आमची हवाई संरक्षण प्रणाली सक्रिय आहे. येणाऱ्या संभाव्य धोक्यांना परतवून लावण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, असे इस्त्रायलच्या लष्कराने सांगितले आहे. 8 एप्रिल रोजी युद्धविराम लागू झाला होता. त्यानंतर अमेरिका-इस्त्रायल यांनी इराणवर हल्ले करणं थांबवलं होतं. युद्धविराम लागू झाल्यानंतर इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धबंदीसाठी चर्चा सुरू आहे. असे असतानाच सध्या हा नवा संघर्ष उफाळून आला आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us