AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराण-इस्त्रायल युद्धात भारताचा तडकाफडकी मोठा आदेश, भारतीयांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी!

एकीकडे इराणची अमेरिकेसोबत शांततेसाठी चर्चा सुरू असतानाच इराणने रविवारी रात्री उशिरा इस्त्रायलवर हल्ला केला. इस्त्रायलकडून लेबॉननवर हल्ले केले जात आहेत. याच हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने हा हल्ला केला होता.

इराण-इस्त्रायल युद्धात भारताचा तडकाफडकी मोठा आदेश, भारतीयांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी!
narendra modi and iran israel warImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 08, 2026 | 2:55 PM
Share

Iran Israel War : युद्ध संपवण्यासाठी इराण आणि अमेरिका यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. परंतु या चर्चेतून काहीही ठोस असं समोर आलेलं नाही. उलट दोन्ही देश एकमेकांच्या भूमिकांवर ठाम असल्याने कोणत्याही क्षणी युद्ध पुन्हा भडकण्याची भीती व्यक्त केली जात होती. आता हीच भीती खरी ठरली आहे. इस्त्रायल आणि इराण या दोन्ही देशांनी एकमेकांवर मोठे हल्ले केले आहेत. हे हल्ले एवढे भीषण आहेत की, पुन्हा एकदा युद्ध सुरू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. नव्याने सुरू झालेल्या या हल्ल्यानंतर आता भारतानेही सावध पवित्रा घेतला आहे.

भारताने नेमकं काय केलं?

मिळालेल्या माहितीनुसार इस्त्रायल आणि इराण यांच्यातील नवा संघर्ष लक्षात घेऊन भारताने आपल्या नागरिकांसाठी काही सूचना केल्या आहेत. इराणमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी काळजी घ्यावी. सतर्क राहावे, असे भारतीय प्रशासनाने आवाहन केले आहे. तसेच भारतीय नागरिकांनी लवकरात लवकर इराणमधून बाहेर पडावे, असेही भारताने सूचवले आहे. भारतीय नागरिकांनी सध्या इराणची यात्रादेखील करू नये, इराणला जाणे टाळावे, असा सल्ला भारतीय प्रशासनाने दिला आहे.

भारतीय दूतावासाने नेमकं काय सांगितलं?

तेहरान येथील भारतीय दूतावासाने या सूचना जारी केल्या आहेत. “सध्याची इराणमधील बिघडलेली परिस्थिती लक्षात घेता आम्ही भारतीयांनी इराणमध्ये जाण्याचे टाळावे, असा सल्ला देत आहोत. सध्या जे भारतीय नागरिक इराणमध्ये आहेत, त्यांनीदेखील लवकरत लवकर कोणत्याही मार्गाने इराण देश सोडावे,” असेदेखील इराणमध्ये असलेल्या भारतीय दूतावासाने आपल्या सूचनांमध्ये म्हटले आहे.

इराण-इस्त्रायलमध्ये संघर्ष का पेटला?

दरम्यान, एकीकडे इराणची अमेरिकेसोबत शांततेसाठी चर्चा सुरू असतानाच इराणने रविवारी रात्री उशिरा इस्त्रायलवर हल्ला केला. इस्त्रायलकडून लेबॉननवर हल्ले केले जात आहेत. याच हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने हा हल्ला केला होता. इराणच्या हल्ल्यानंतर इस्त्रायलनेदेखील इराणवर प्रत्युत्तरादाखल मोटे हल्ले केले. इस्फहान, करज, तबरीज, तेहरान या भागात हल्ले झाल्याचे सांगितले जात आहे. इस्त्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने तेहरान येथील इमाम खुमैनी अंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरातील हवाई क्षेत्र बंद केले आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
भाऊ मैदानात लढतोय, बहिणीने जेवायला बोलवू नये! अमृता फडणवीसांच्या...
Manoj Jarange | भाऊ मैदानात लढतोय, बहिणीने जेवायला बोलवू नये! अमृता फडणवीसांच्या निमंत्रणाला मनोज जरांगेंचा नकार; पुढे म्हणाले...
मुंढवा जमीन प्रकरणात पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही?
Rohit Pawar on Parth Pawar | मुंढवा जमीन प्रकरणात पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? हायकोर्टाच्या सवालानंतर रोहित पवारांचा मोठा सल्ला, म्हणाले...