भारतीय हवाई दलाची ताकद वाढणार? Su-57 स्टेल्थ फायटरसाठी रशिया भारताकडे धावला

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (HAL) 'तेजस' विमानांच्या इंजिन पुरवठ्यास विलंब केल्याबद्दल अमेरिकन कंपनी 'GE एरोस्पेस'वर कडक दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, रशियन प्रतिनिधींनी भारताला त्यांच्या आधुनिक पाचव्या पिढीच्या Su-57 स्टेल्थ फायटर जेटबद्दल सादरीकरण दिले असल्याची माहिती HAL प्रमुखांनी दिली आहे.

भारतीय हवाई दलाची ताकद वाढणार? Su-57 स्टेल्थ फायटरसाठी रशिया भारताकडे धावला
Tejas engine
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 04, 2026 | 12:53 PM

‘तेजस’ विमानांच्या इंजिन पुरवठ्याबाबत ही मोठी बातमी आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे (HAL) अध्यक्ष डी. के. सुनील यांनी गुरुवारी सांगितले की, अमेरिकन कंपनी जनरल इलेक्ट्रिकने डिसेंबरपर्यंत 20 F-404 इंजिन वितरित करण्याचे आश्वासन दिले आहे. पण, ‘HAL’ ला एप्रिल अखेरपर्यंत LCA तेजस मार्क 1A प्रकल्पासाठी केवळ सहावे GE इंजिन मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे LCA तेजस विमानांच्या इंजिनांच्या पुरवठ्यात विलंब झाल्यास HAL ‘GE’ वर कंत्राटी दंड आकारत आहे आणि 99 इंजिनांच्या करारानुसार GE एरोस्पेसवर दंड आकारला जात आहे.

फेब्रुवारी 2021 मध्ये, संरक्षण मंत्रालयाने भारतीय हवाई दलासाठी 83 तेजस MK -1A च्या खरेदीसाठी HAL लबरोबर 48,000 कोटी रुपयांचा करार केला होता. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मंत्रालयाने हवाई दलासाठी 97 तेजस MK-1A वजनाची हलकी लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी HAL सोबत 62,370 कोटी रुपयांचा आणखी एक करार केला होता.

रशियाचे पाचव्या पिढीचे स्टेल्थ फायटर जेट SU-57 खरेदी करण्यात भारताला रस आहे का, या प्रश्नावर HAL चे अध्यक्ष म्हणाले, “मला वाटते की विमानाच्या क्षमतेबाबत रशियन पथकाने हवाई दलाच्या टीमला SU-57 संदर्भात सादरीकरण केले आहे. आम्ही गुंतवणूकीबद्दल रशियन कोटेशनची वाट पाहत आहोत. त्यानंतर आम्ही हवाई दलाशी संपर्क साधू की, या विमानांच्या निर्मितीसाठी या प्रकारच्या संख्येची आवश्यकता आहे आणि ही टाइमलाइन आहे.”

के. सुनील यांनी सांगितले की, 34 तेजसचा संपूर्ण ताफा 8 एप्रिलपासून उड्डाण करेल कारण विमानाच्या सॉफ्टवेअरमध्ये आढळलेली बिघाड दूर झाली आहे. ते म्हणाले, “पुढील बुधवारपासून सर्व तेजस विमाने पुन्हा उड्डाण करणार आहेत.” फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तेजस विमानाच्या एअरबेसवरील धावपट्टीवरून उड्डाण झाल्यानंतर त्याच्या एअरफ्रेमचे नुकसान झाले होते.

GE कडून इंजिन पुरवठ्याचे आश्वासन

GE ने या वर्षाच्या अखेरपर्यंत आणखी 20 इंजिन देण्याचे आश्वासन दिले आहे. सध्या 99 पैकी केवळ 6 इंजिन भारताला प्राप्त झाली आहेत. जागतिक पुरवठा साखळीतील अडचणींमुळे हा विलंब होत असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

तेजस विमानांच्या उत्पादनावर परिणाम

इंजिन वेळेवर न मिळाल्यामुळे ‘तेजस मार्क-१A’च्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. तरीही, HAL ने डिसेंबरपर्यंत जवळपास 20 विमाने तयार ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, रडार आणि क्षेपणास्त्र चाचण्यांनंतर त्यांचे वितरण सुरू होईल.

हवाई दलाची ताकद वाढवण्याचे प्रयत्न

हवाई दलातील फायटर स्क्वाड्रन्सची कमी झालेली संख्या भरून काढण्यासाठी तेजस विमाने महत्त्वाची आहेत. त्याचप्रमाणे, Su-57 सारख्या अत्याधुनिक विमानांबाबतचे सादरीकरण भारताच्या भविष्यातील संरक्षण रणनीतीचा भाग असू शकते.

Follow Us