AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sheikh Hasina : जमीन ते आकाशावर नजर, फायटर जेट्सचा वापर, शेख हसीना यांच्यासाठी भारताचं स्पेशल ऑपरेशन

Sheikh Hasina : बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना आश्रयासाठी भारतात आल्या आहेत. काल त्यांना सैन्याने देश सोडण्यासाठी काहीवेळाचा अवधी दिला होता. बांग्लादेशातून त्या निघाल्यानंतर भारतात येईपर्यंतचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता. शेख हसीना यांना सुरक्षित आणण्यासाठी भारतीय सुरक्षा यंत्रणांनी काय केलं ते जाणून घ्या.

Sheikh Hasina : जमीन ते आकाशावर नजर, फायटर जेट्सचा वापर, शेख हसीना यांच्यासाठी भारताचं स्पेशल ऑपरेशन
sheikh hasina
| Updated on: Aug 06, 2024 | 1:44 PM
Share

बांग्लादेशात काल भयानक हिंसाचार झाला. परिस्थिती चिंताजनक बनलेली. पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर देश सोडण्यासाठी शेख हसीना यांना सैन्याने काही वेळाचा अवधी दिला होता. शेख हसीना यांनी तात्काळ भारतात येण्याचा निर्णय घेतला. बांग्लादेश ते भारत हा शेख हसीना यांचा प्रवास सोपा नव्हता. कारण संपूर्ण बांग्लादेशात हिंसाचार सुरु होता. अराजकतत्व रस्त्यावर होती. परिस्थिती हाताबाहेर होती. कोणाकडे काय शस्त्र आहे? अशावेळी आपला हेतू साध्य कोण काय करेल? याची अजिबात कल्पना नव्हती. त्यामुळे शेख हसीना यांनी बांग्लादेश सोडल्यानंतर पुढचे काही तास महत्त्वाचे होते. शेख हसीना भारतात येत असल्याच समजल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी सुद्धा प्रचंड खबरदारी घेतली. भारतीय सुरक्षा यंत्रणा कुठल्याही आपतकालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज होत्या.

C-130J या अमेरिकन बनावटीच्या ट्रान्सपोर्ट विमानाने शेख हसीना भारतात आल्या. AJAX या विमानाची साईन होती. दुपारी 3 च्या सुमारास भारतीय सीमेजवळ कमी उंचीवरुन हे विमान उड्डाण करताना दिसलं. सूत्रांच्या माहितीनुसार, इंडियन एअर फोर्सने आपले रडार Active केले होते. बांग्लादेशच्या हवाई क्षेत्रावर या रडारची नजर होती. कमी उंचीवरुन उड्डाण करणाऱ्या C-130J या विमानाला भारतात येण्याची परवानगी देण्यात आली. विमानात कोण आहे? ते एअर फोर्सच्या अधिकाऱ्यांना माहित होतं.

राफेल फायटर जेट्सच उड्डाण

C-130J या विमानाला मदत आणि काही तात्काळ गरज पडल्यास सुरक्षा प्रदान करण्यासाठी पश्चिम बंगालच्या हाशिमारा एयरपोर्टवरुन दोन राफेल फायटर जेट्सनी उड्डाण केलं, असं सूत्रांनी सांगितलं. शेख हसीना यांच्या C-130J विमानाबरोबर कुठलाही घातपात होऊ नये, म्हणून यंत्रणांच अत्यंत बारीक लक्ष होतं. इंडियन एअर फोर्सचे प्रमुख वीआर चौधराी आणि आर्मी चीफ जनरल उपेन्द्र द्विवेदी परिस्थितीवर लक्ष ठेऊन होते. इंटेल एजेंसी प्रमुख जनरल द्विवेदी आणि इंटीग्रेटेड डिफेंस स्टाफ प्रमुख लेफ्टिनेंट जनरल जॉनसन फिलिप मॅथ्यू यांची एक बैठक सुद्धा झाली.

डोवाल यांच्याकडून स्वागत

शेख हसीना यांच्या विमानाने संध्याकाळी 5:45 वाजता गाजियाबादच्या हिंडन एयरपोर्टवर लँड केलं. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजीत डोभाल यांनी त्यांच स्वागत केलं. शेख हसीना यांच्यासोबत डोवाल यांनी एक तास चर्चा केली. बांग्लादेशातील वर्तमान स्थिती आणि भविष्याबद्दल चर्चा केली. त्यानंतर संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक झाली. त्यात बांग्लादेशातील सगळ्या घटनाक्रमाची माहिती देण्यात आली.

Follow Us
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...
शिवसेना सुनावणीच्या अखेरीस कोर्टाची मोठी टिप्पणी, विधीमंडळ पक्ष...
Shivsena : आजच्या सुनावणीच्या अखेरीस कोर्टाची मोठी टिप्पणी, विधीमंडळ पक्ष चाचणीचे महत्त्व...
शिवसेना कुणाची? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद; म्हणाले, फुटी..
Shivsena Hearing Upadate : शिवसेना कुणाची? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद; म्हणाले, फुटीनंतरही...
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणा..
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणासह शेतकरी मदतीबाबत काय म्हणाले?
जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं...
Bajrang Sonavane | जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं मोठं वक्तव्य
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या...
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या वडनगरहून रस्ते मार्गाने रवाना
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन
Devendra Fadnavis | शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन; 5 ऑक्टोबरनंतर पंचनामे होणार
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात...
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात मोठ्या हालचाली
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा...
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा आंदोलनाचा समारोप