AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किती दिवस लढू शकतील इराण आणि इस्राईल?,खजाना होत आहे रिता, कोणाकडे किती दौलत पाहा

इस्राईल आणि इराण या दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेला या युद्धाने संकट निर्माण झाले आहे. इस्राईलवर गाझाच्या युद्धाचा ६७ अब्ज डॉलरचा बोजा असताना हे नव संकट आहे तर इराणची अवस्था वाईट आहे तेल निर्यात युद्धाने ठप्प आहे. तसेच दक्षिण पार्स गॅस क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.

किती दिवस लढू शकतील इराण आणि इस्राईल?,खजाना होत आहे रिता, कोणाकडे किती दौलत पाहा
| Updated on: Jun 21, 2025 | 9:29 PM
Share

इस्राईल आणि इराण दरम्याने सात दिवसांपासून घमासान युद्ध सुरु आहे. दोन्ही देश एकमेकांच्या रहिवासी क्षेत्रांवर हल्ले करीत आहेत.आतापर्यंत इस्राईलचे २४ तर इराणे २४० लोक ठार झालेले आहेत. दोन्ही देशाच्या इन्फ्रास्ट्रक्चकरला मोठा धक्का बसला आहे. याचा परिणाम दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेवर पडला आहे. इस्राईलसाठी हे युद्ध महागडे ठरत आहे. चला पाहूयात कोणाची अर्थववस्था हे युद्ध पेलू शकते. ..

दोन्ही देशांचा GDP काय ?

इराण आणि इस्राईल या दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेची तुलना करायची झाली तर इस्राईलची स्थिती मजबूत आहे.साल २०२४ च्या इस्राईलचा जीडीपी अर्थात सकल घरेलु उत्पादन ५६४ अब्ज डॉलर होते. तर इराणचा जीडीपी ३८८ अब्ज डॉलर आहे. दरडोई उत्पन्नाच्या बाबतीतही इस्राईलच पुढे आहे. इस्राईलचे दरडोई उत्पन्न ५८ हजार डॉलर आहे तर इराणचे ४,४०० डॉलरच्या आसपास आहे.

इराण GDP :     388 अब्ज डॉलर

इस्राईल GDP :  564 अब्ज डॉलर

इस्राईलला महाग पडतेय युद्ध

इस्राईलचा आधीच गाझापट्टीतील संघर्षात आर्थिक बोज वाढला आहे. गाझा युद्धाचा खर्च ६७ अब्ज डॉलरहून अधिक झाला आहे. इराणच्या सोबतच्या दोन दिवसांच्या युद्धात १.४५ अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे.त्याचा रोजचा खर्च सुमारे ६००० कोटी रुपये आहे. म्हणजेच आतापर्यंत इस्राईलचे ५०,००० कोटी रुपये खाक झाले आहेत. जर संघर्ष असाच लांबला तर अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसणार आहे.

इराणची तेल निर्यात ठप्प

इराणच्या तेल निर्यातीला युद्धाने ब्रेक लागला आहे.खार्ग बेटातून इराण ९० टक्के तेल निर्यात करत असतो. तेथील निर्यात ठप्प झाली आहे. इस्राईलच्या हल्ल्यात इराणच्या पार्स गॅस क्षेत्राचे नुकसान झाले आहे. येथून ८० टक्के गॅसची निर्यात केली जाते. हल्ले असेच सुरु राहीले तर इराणच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसणार आहे.

निर्बंधाने इराणेचे कंबरडे मोडले

अमेरिकेच्या निर्बंधांमुळे इराणमध्ये आर्थिक संकट सुरु आहे. साल २०२२-२३ मध्ये इराणच्या तेल निर्यातीतून केवळ ५० अब्ज डॉलरची कमाई होत आहे. जी साल २०१६ च्या तुलनेत कमी आहे. महागाई ४० टक्क्यांहून अधिक आहे. चलन रियालचे किंमत घसरत आहे. त्यामुळे अशात युद्धाचा खर्च इराणच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडत आहे.

इस्राईलचे संरक्षण बजेट

वर्ष संरक्षण बजेट (शेकलमध्ये )    –   संरक्षण बजेट (डॉलरमध्ये अंदाजित )

2023 – 60 अब्ज                            –   सुमारे  $16 अब्ज

2024 –  99 अब्ज                             – सुमारे $26 अब्ज

2025 (अंदाजित) 118 अब्ज              -सुमारे $31 अब्ज

तर इराणचे संरक्षण बजेटनेही 10 अब्ज डॉलरचा आकडा पार केलेला आहे.

दोन्ही देशांची युद्ध दीर्घकाळ लढण्याची तयारी ?

इस्रायलची अर्थव्यवस्था मजबूत आहे, परंतु संरक्षण खर्चात मोठी वाढ झाल्याने त्याची वित्तीय तूट वाढू शकते. दुसरीकडे, इराण आधीच आर्थिक समस्यांनी ग्रस्त झालेला आहे आणि त्याच्याकडे युद्धासाठी मर्यादित साधने आहेत. जर हे युद्ध दीर्घकाळ चालू राहिले तर दोन्ही देशांची आर्थिक स्थिती बिघडू शकते.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.