केवळ आठ तासांत पाकिस्तानने कसे गुडघे टेकले ? तालिबानशी युद्ध आणि सिजफायरची संपूर्ण कहाणी

पाकिस्तान आणि तालिबान दरम्यान सिजफायरची घोषणा झाली आहे. परंतू यामागे पाकिस्तानचे सरेंडर आहे. केवळ ८ तासांत तालिबानी सैनिकांनी असे प्रत्युत्तर दिले की पाकिस्तानच्या सैन्याला गुडघे टेकावे लागले.

केवळ आठ तासांत पाकिस्तानने कसे गुडघे टेकले ? तालिबानशी युद्ध आणि सिजफायरची संपूर्ण कहाणी
| Updated on: Oct 15, 2025 | 10:09 PM

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात युद्ध भडकले आणि लागलीच सिजफायर देखील झाला आहे. पाकिस्तानच्या सैन्याने तालिबानी सैन्यांच्या समोर लागलीच गुडघे टेकले आहेत. पाकिस्तानी सैन्याला वाटले होते की आपण फायटर जेट पाठवून, ड्रोनने बॉम्बफेक केल्याने तालिबानी सैनिक घाबरतील. पाकिस्तानने काबूलवर दोन बॉम्ब टाकले.परंतू नंतर तालिबानी सैन्याने असे जोरदार प्रत्युत्तर दिले की पाकिस्तानचे सैन्यांची हायतोबा झाली आणि त्यांनी सपशेल गुडघे टेकले. पाकिस्तानमधून मिळालेल्या माहितीनुसार केवळ आठ तासातच पाकिस्थानने पांढरे निशाण फडकवत सिजफायर करण्यासाठी आर्जवे केले आणि त्याला तालिबानच्या शर्तीवर युद्ध रोखावे लागले. असे काय झाले नेमके ?

डोलो न्यूजच्या अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की बुधवारी सकाळी पाकिस्तानी सैन्याने अफगाणिस्तानच्या स्पिन बोल्डक इलाख्यात बॉम्बबारी केली. त्यानंतर तालिबानच्या सैन्याने याचे जोरदार प्रत्युत्तर दिले. आणि पाकिस्तानी सैन्याचे मोठे नुकसान केले. सूत्रांच्या मते पाकिस्तानी सैनिकांचे मृतदेह युद्धक्षेत्रातच पडून राहिले तर काहींनी जीवंत पकडण्यात आले. त्यानंतर पाकिस्तानी सरकारने विभिन्न माध्यमातून तालिबानींकडे सीजफायरसाठी आर्जवे केली.

काय ठेवली अट?

सुरुवातीला तालिबानी सैन्याने पाकिस्तानच्या सैन्याची विनंती धुडकावून लावली. त्यानंतर वारंवार विनंती केली गेल्यानंतर पाकिस्तानचा युद्धबंदीचा प्रस्ताव स्वीकारला गेला. त्यावेळी अफगाणिस्तानने अट घातली जर पुन्हा असा हल्ला झाला तर त्याचे उत्तर याहून भयानक असेल. आता पाकिस्तानने अधिकृतपणे ४८ तासांचा सिजफायर मागितला असून त्यास तालिबानी सरकारने मंजूरी दिली आहे. तालिबानच्या वतीने सांगण्यात आले आहे की सिजफायर दरम्यानच्या स्थितीची टेहळणी केली जाईल. परंतू हे स्पष्ट सांगितले गेले की जर सीमेचे उल्लंघन केले गेले तर तालिबान तातडीने प्रत्युत्तर देईल.

ताल‍िबान सरकारने काय सांगितले ?

अफगाणिस्तानातील सरकारने सांगितले आहे की या हल्ल्यात पाकिस्तानच्या सैन्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे अनेक जवान ठार झाले आहेत. पाकिस्तानने सैनिक त्यांच्या सैन्याचे मृतदेह सोडून पळाले आहेत. अनेक सैनिक आमच्या ताब्यात आहेत. पाकिस्तान सरकार वारंवार आमच्याशी संपर्क करत आहे आणि सैनिकांचे मृतदेह परत मागत आहेत. परंतू पाकिस्तानने डुरंड सीमारेषेचे सन्मान करायला हवा. जर त्यांनी पुन्हा असा प्रकार केला तर त्यांनी कठोर उत्तर देण्यात येईल असेही तालिबानने म्हटले आहे.