होर्मुजमध्ये थेट भारतीय नाैदल उतरण्याची शक्यता, उच्चस्तरीय बैठकीला सुरूवात, काही वेळातच इराणच्या…

होर्मुज सामुद्रधुनी इराणकडून बंद करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली. अख्खे जग तणावात असून मार्ग निघण्याचे काहीच संकेत दिसत नाहीत. यादरम्यानच भारताकडून थेट उपायोजनांना सुरूवात करण्यात आली.

होर्मुजमध्ये थेट भारतीय नाैदल उतरण्याची शक्यता, उच्चस्तरीय बैठकीला सुरूवात, काही वेळातच इराणच्या...
Indian naval landing in Iran Strait of Hormuz
| Updated on: Mar 12, 2026 | 1:56 PM

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाचा फटका अनेक देशांना बसत आहे. तेल आणि गॅसची आणीबाणी लागू झाली. त्यामध्येच इराणकडून होर्मुजच्या सामुद्रधुनी बंद करण्यात आल्याचा धक्कादायक निर्णय घेण्यात आला. यामुळे अनेक देशात संकट आहे. भारतातही एलपीजी गॅसचा पुरवठा विस्कळीत झाला. हेच नाही तर काल होर्मुझच्या सामुद्रधुनीहून भारताच्या दिशेने निघालेल्या भारतीय जहाजावर मोठा हल्लाही करण्यात आला. यादरम्यानच भारत मोठे पाऊस उचलण्याच्या तयारीत असल्याचे बघायला मिळत आहे. होर्मुजच्या सामुद्रधुनीजवळ अडकलेल्या भारतीय जहाजांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी भारत सरकार नौदलाला तैनात करण्याचा विचार करत आहे. त्याबाबत एक अत्यंत महत्वाची बैठक दिल्लीमध्ये सुरू आहे. भारत नक्की काय निर्णय घेतो, याकडे संपूर्ण जगाच्या नजरा आहेत. कारण जवळपास सर्वच देशांचे जहाज होर्मुजच्या सामुद्रधुनी अडकले आहेत.

इराणकडून तसा होर्मुजच्या सामुद्रधुनी भारतासाठी खुला करण्यात आला असून भारताचे जहाज जाऊ देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, काल झालेल्या भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर भारत आधिक सर्तक झाल्याचे बघायला मिळत आहे. नुकताच मिळालेल्या अहवालानुसार, पर्शियन आखात आणि ओमानच्या जवळ अंदाजे 40 भारतीय जहाजे अडकली आहेत.

यापैकी अनेक जहाजे इराणजवळील पाण्यातून सुरक्षित मार्गाची वाट पाहत आहेत. इराणकडून भारताला आश्वासन देण्यात आले की, भारतीय ध्वज असलेल्या जहाजांना सुरक्षित मार्ग दिला जाईल. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या देखरेखीखाली पंतप्रधान कार्यालयात उच्चस्तरीय आढावा सुरू आहे. याबाबत एका अधिकाऱ्यांनी महत्वाची माहिती सांगितली.

यादरम्यान अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरक्षा परिस्थिती जर बिघडली तर व्यापारी जहाजांच्या संरक्षणासाठी आम्ही भारती नाैदलाच्या युद्धनाैका तैन्यात करू, तशी भारताची तयारीही सुरू आहे. म्हणजे थोडक्यात काय तर भारताकडून होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये युद्धनाैका भारतीय जहाजांसाठी उतरवल्या जाऊ शकतात. होर्मुजच्या सामुद्रधुनी बंद केल्याने भारतातही मोठ्या प्रमाणात तणाव बघायला मिळाला. भारतात कच्च्या तेलाची म्हणावी तेवढी समस्या नाही पण एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा असल्याची परिस्थिती आहे.

Follow Us