या देशात तरुणी बाल्कनीतून चेंडू टाकतात आणि जो कॅच पकडेल तो होतो पती !

तुम्ही कधी अशा प्रथेबद्दल ऐकले आहे का ज्यात चेंडू फेकून लग्न ठरवले जाते. हे ऐकायला थोडे विचित्र वाटेल, पण हजारो वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आजही टिकून आहे. तरुणी आपल्या बाल्कनीतून चेंडू फेकतात आणि जो पुरुष तो झेलतो, तो त्यांचा नवरा बनतो...

या देशात तरुणी बाल्कनीतून चेंडू टाकतात आणि जो कॅच पकडेल तो होतो पती !
women throw balls from balconies to choose husbands
| Updated on: Aug 13, 2026 | 10:26 PM

जगभरात वधू वराची निवड करण्याची पद्धत वेगवेगळी असते. कुठे वर एखादा अचाट पराक्रम करुन दाखवतो त्यानंतर वधू त्याला पसंद करते. मात्र एका देशात महिला बाल्कनीत उभे राहून एक चेंडू खाली उभ्या असलेल्या तरुणांच्या दिशेने फेकतात. त्यानंतर जो तरुण हा चेंडू अलगद झेलतो त्याला ती वधू आपला भावी वर म्हणून पसंद करते. ही प्राचीन वर निवडण्याची परंपरा या देशातील आदिवासी जाती मध्ये असल्याचे दाखले दिले जातात.

असली कहानी थोडी वेगळी आहे. चेंडू फेकण्याची परंपरा चीनमध्ये जरुर आहे. मात्र, आता बाल्कनीतून चेंडू फेकून कोणा अनोळखी तरुणाला पती निवडण्याची प्रथा आला पाळली जात नाही. आता सर्वकाही आधीच ठरलेले असते. म्हणजे दक्षिण चीनच्या गुंआंग्शी भागात राहणारे झुआंग समुदायात हा चेंडू प्रेमाचा कबुली देण्याचा एक पारंपारिक पद्धत आहे. यात एकमेकांना पसंद करणारे तरुण-तरुणीच एकमेकांकडे नेम धरुन चेंडू फेकतात

जुने चीनी कादंबरी आणि पीरियड ड्रामामध्ये चेंडूद्वारे पती निवडण्याची प्रथा अनेकदा पाहायला मिळाली आहे. १६ व्या शतकात लिहिलेल्या प्रसिद्ध कादंबरी ‘जर्नी टू द वेस्ट’मध्ये देखील हा वर-वधू निवडीचा प्रसंग चितारला आहे.या कादंबरीतील मुख्य कॅरेक्टर श्वेनजांगचे वडील त्याच्या आईची निवड अशाच प्रकारे चेंडू फेकून करतात. या घटनेद्वारे संपूर्ण कहानी दाखवली आहे.

याच प्रकारे १९८९ चा प्रसिद्ध चीनी टीव्ही ड्रामा ‘माय फेअर प्रिन्सेस ‘ मध्ये एका श्रीमंत कुटुंबातील मुलगी अशा प्रकारे वराची निवड करताना दाखवली आहे. या कहानीत तिचे वडील लग्नाला विरोध करतात. कारण मुलीचा चेंडू एक गरीब मुलगा झेलतो. अशा कहाणी अनेकदा चित्रपटात, मालिकेत आणि साहित्यात दाखवण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक लोकांना वाटते की प्राीन चीनमध्ये खरोखरच हा वर शोधण्याची पद्धत होती. परंतू इतिहास काही वेगळेच सांगतो.

दक्षिण चीनमध्ये गुआंग्शी झुआंग स्वायत्त क्षेत्रात राहणाऱ्या झुआंग समुदायात चेंडू फेकण्याची परंपरा खूप लोकप्रिय होती.
झुआंग समुदायाची संख्या गुआंग्शीची लोकसंख्येच्या ३० टक्क्यांहून अधिक होती. येथे तरुण आणि तरुणी या चेंडूंचा वापर एकमेकांच्या प्रति प्रेम जाहीर करण्यासाठी करायचे.

तिसऱ्या चंद्र महिन्याच्या तिसऱ्या दिवशी होणाऱ्या पारंपारिक फेस्टीव्हलमध्ये तरुण मोठ्या संख्येने जमा व्हायचे. येथे गाणी म्हटली जायची आणि तरुण-तरुणी एकमेकांना प्रेमाची मागणी घालायचे.जर दोन जोडपी एकमेकांना पसंद करत असतील तर ते एकमेकांकडे चेंडू फेकायचे.अनेकदा चेंडू सोबत एक गिफ्ट देखील बांधले जायचे. म्हणजे केवळ चेंडी कॅच केला आणि लग्न झाले असे व्हायचे नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us