भारताला या देशाने दिली मोठी साथ, जग बघतच राहिले, थेट भारतासोबत मिळून 15..

अमेरिकेने लावलेल्या मोठ्या टॅरिफनंतरही भारताने जगाला दाखवून दिले की, भारत कोणासमोरही झुकणार नाही. भारताने थेट अमेरिकेच्या विरोधात भूमिका घेतली. भारत सध्या अनेक देशांसोबत व्यापार करार करताना दिसत आहे. त्यामध्येच भारताच्या मदतीला एक देश धावून आला.

भारताला या देशाने दिली मोठी साथ, जग बघतच राहिले, थेट भारतासोबत मिळून 15..
India and New Zealand
| Updated on: Dec 22, 2025 | 7:50 PM

भारत आणि अमेरिकेतील संबंध सध्या तणावात आहेत. यादरम्यान भारताच्या मदतीला अनेक देश धावून आले. भारताने काही देशांसोबत मुक्त व्यापार करार करत होणारे नुकसान टाळले आहे. अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला. अमेरिकेत होणारी जवळपास निर्यात भारताची बंद झाली. भारताच्या मदतीला न्यूझीलंड धावून आला आहे. भारताने न्यूझीलंडसोबत मुक्त व्यापार करार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी ही घोषणा केली. न्यूझीलंड आणि भारतातील अनेक वर्षांचे चांगले संबंध आहेत. त्यामध्येच भारतावर अमेरिकेने निर्बंध लादलेले असतानाच न्यूझीलंड भारतासाठी मैदानात आला. न्यूझीलंडने त्यांचे मार्केट भारतासाठी खुले केले आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मुक्त व्यापार करारावरील वाटाघाटी मार्च 2025 मध्ये सुरू झाल्या, जेव्हा पंतप्रधान लक्सन यांनी भारताला भेट दिली.

या करारानुसार, न्यूझीलंड पुढील 15 वर्षांत भारतात 20 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करेल. या गुंतवणुकीमुळे कृषी, दुग्धव्यवसाय, शिक्षण, तंत्रज्ञान आणि स्टार्टअप्स यांसारख्या क्षेत्रांमध्ये संधी निर्माण होतील. या करारातील विशेष बाब म्हणजे हा करार न्यूझीलंडसोबतचा गेल्या काही वर्षांतील भारताचा सातवा मोठा मुक्त व्यापार करार आहे. ओमान, यूएई, यूके, मॉरिशस, ऑस्ट्रेलिया आणि ईएफटीए देशांसोबत असेच करार केले आहेत.

अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर भारताने अनेक देशांसोबत मुक्त व्यापार करार केली आहेत. विशेष म्हणजे अमेरिकेने इतक्या मोठ्या प्रमाणात भारतावर टॅरिफ लावल्यानंतरही भारताचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. उलट भारतीय वस्तूंची अमेरिकेत मागणी वाढली. भारतावर लावलेल्या टॅरिफच्या माध्यमातून जगापुढे अमेरिकेची दुटप्पी भूमिका आली.

हेच नाही तर मागील अनेक वर्षांमध्ये भारत आणि चीनमधील संबंध तणावपूर्ण राहिले आहेत. मात्र, अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर भारत आणि चीनमधील संबंध चांगलीच सुधारली. भारताच्या बाजूने चीन उभा राहिला आणि थेट अमेरिकेच्या विरोधात भूमिका घेतली. भारत आणि चीनने यादरम्यान काही महत्वपूर्ण करार देखील केली. त्यामध्येच न्यूझीलंडही भूमिका घेतल्याचे बघायला मिळत आहे.