
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलली. भारताने सिंधू पाणी करार रद्द केला. तसेच आयात-निर्यातीवर बंदी आणली. पाकिस्तानविरोधात अनेक कठोर उपाय भारताने केल्यानंतर लष्करी कारवाईसाठी भारतीय लष्कराला खुली छूट दिली आहे. आता भारत पाकिस्तानवर मोठी कारवाई करु शकतो, अशी चर्चा सध्या सुरु आहे. त्या चर्चेत पाकिस्तानी राजकारणी शेर अफजल खान मारवात यांचे वक्तव्य व्हायरल झाले आहे.
पाकिस्तान नॅशनल असेम्बलीचे सदस्य असलेल्या अफजल खान मारवात यांना पत्रकारांनी भारत-पाकिस्तान युद्धाबाबत प्रश्न विचारला. भारत पाकिस्तानमध्ये युद्ध झाल्यावर तुम्ही लढणार का? त्यावर त्यांनी दोन्ही देशांमध्ये युद्ध झाल्यावर मी इंग्लंडमध्ये निघून जाईल, असे उत्तर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी पावले उचलायला हवे होते? असा प्रश्न मारवत यांना पुन्हा विचारण्यात आला. त्यावर मारवात म्हणतात, मोदी माझ्या आत्याचा मुलगा आहे का? ज्यामुळे मी सांगितल्यावर ते माघार घेतील. त्यांचे हे उत्तर सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. नेटकरी म्हणतात, पाकिस्तानी राजकारण्यांनाही आपल्या लष्करावर विश्वास राहिला नाही.
शेर अफजल खान मारवत हे एक ज्येष्ठ पाकिस्तानी राजकारणी आहेत. ते माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) मध्ये होते. परंतु त्यांनी अनेक वेळा पक्ष आणि त्यांच्या नेत्यांवर टीका केली आहे. ज्यामुळे इम्रान खान यांनी त्यांना पदांवरून काढून टाकले.
Journalist : Agar india ne attack kar diya to?
Shet Afzal Khan Marwat : To hum London bhag jayengeAfzal Khan is a senior terrorist in Pakistan.
Even they don’t trust their army. 😂 pic.twitter.com/LBmFQ1ysSr
— rae (@ChillamChilli) May 3, 2025
दरम्यान, भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव कायम आहे. शनिवारी रात्री पाकिस्तानी सैन्याने सलग दहाव्या दिवशी जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूर भागात गोळीबार केला. दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेवर (एलओसी) आजूबाजूच्या भागात लहान शस्त्रांनी गोळीबार केला. त्याला भारतीय सैन्याने दुप्पट ताकदीने प्रत्युत्तर दिले.