भारताचे तीन घातक शस्त्रे, चीनसुद्धा घाबरला होता…पाकिस्तानचा तर थयथयाट होणार
India Dangerous Weapons: लडाखच्या पठार प्रदेशात ज्या विध्वंसक टँकच्या गर्जनेने चीनी सैनिकांना घाबरवले होते ते T-90 भीष्म रणगाडा आहे. या भारतीय लढाऊ टँकची गर्जना अशी आहे की त्यात पाकिस्तानचा नकाशा बदलण्याची ताकद त्याच्यात आहे.

India Dangerous Weapons: भारत आणि पाकिस्तान दरम्यान पहलगाम हल्ल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कारगिल युद्धात पाकिस्तानला भारताने केवळ बोफर्स तोफांवर जेरीस आणले होते. 1999 मधील या युद्धाच्या 26 वर्षांनी भारताने खूप मोठा टप्पा गाठला आहे. आज भारतीय लष्कराकडे महाबली आहे. त्या महाबलीकडून शत्रूच्या खात्माची गॅरंटी आहे.
जगात अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत चौथ्या क्रमांकाची लष्करी शक्ती आहे. पाकिस्तान बाराव्या क्रमांकावर आहे. म्हणजेच पाकिस्तानच्या तुलनेत तिप्पट शक्ती भारताकडे आहे. भारतीय लष्काराकडे 14.44 लाख सक्रीय सैनिक आहे. पाकिस्तानकडे 6.54 लाख सैनिक आहे. भारताकडे 25 लाख 27 हजार पॅरामिलिट्री जवान आहेत. पाकिस्तानकडे 5 लाख ही आहे. रिजर्व्ह फोर्सचा विचार केल्यावर भारताकडे 11.55 लाख सैनिक आहे तर पाकिस्तानकडे 5.5 लाख राखीव सैन्य दल आहे.
शस्त्रांचा विचार केल्यास भारताकडे टी-90 भीष्म आणि अर्जुनसारखे शक्तीशाली टँक आहे. मोबाइल आर्टिलरी म्हणजे एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी नेण्यात येणारी तोफे भारताकडे जास्त आहे. पाकिस्तानच्या तुलनेत भारताकडे 1.6 टक्के जास्त तोफे आहेत.
पाकिस्तानचा काळ K-9 वज्र
भारतीय सैन्याची एक शक्तिशाली तोफ K-9 वज्र आहे. ज्यामुळे भारतीय सैन्याची अग्निशक्ती प्राणघातक बनते. K-9 वज्र ही 155 मिमी 52 कॅलिबरची बंदूक आहे. त्याचे वजन सुमारे 47 टन आहे. इतक्या वजनाने ते ताशी 65 किलोमीटर वेगाने धावू शकते. त्याची मारक क्षमता मोठी आहे. 28 ते 38 किलोमीटरपर्यंत ते मारा करु शकतो. K-9 वज्र तोप प्रत्येक 30 सेकंदात 3 राउंड फायर करते. ही तोफ पाकिस्तानी सैन्याची पळता भुई थोडी असा परिस्थिती करेल.
विध्वसंक ‘भीष्म’
लडाखच्या पठार प्रदेशात ज्या विध्वंसक टँकच्या गर्जनेने चीनी सैनिकांना घाबरवले होते ते T-90 भीष्म रणगाडा आहे. या भारतीय लढाऊ टँकची गर्जना अशी आहे की त्यात पाकिस्तानचा नकाशा बदलण्याची ताकद त्याच्यात आहे. त्यात 125 मिलीमीटरची स्मूथबोर गन आहे. 7.62 मिलीमीटरची मशीन गन आहे. भीष्म टँकवरुन एंटी टँक क्षेपणास्त्र सोडता येते. चार किलोमीटरच्या रेंजपर्यंत ते मारा करु शकते. रॉकेट आणि क्षेपणास्त्र याचे काहीच करु शकत नाही. 5 मीटर खोल पाण्यातूनही ते सहज जाऊ शकतो. याच टँकने लडाखमध्ये चीनची झोप उडवली होती.
अर्जुन मुनीर ब्रिगेडसाठी घातक
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या भीतीचे आणखी एक कारण अर्जुन टँक आहे. अचूक लक्ष्य आणि अभेद्य चिलखत असलेला हा शूर योद्धा युद्धभूमीत शत्रूचा खात्मा करतो. अर्जुन टँकवर 120 मिमीची रायफल्ड गन आहे. अर्जुन हाय-एक्सप्लोसिव्ह स्क्वँश हेड डागू शकते. शत्रूच्या टँकसुद्धा हे नष्ट करु शकतो. त्याच्यावर 7.62 मिमी एक्सियल मशीन गन आणि 12.7 मिमी एंटी-एयरक्राफ्ट मशीन गन आहे. अर्जुनकडे संगणकीकृत अग्नी नियंत्रण प्रणाली आहे. दिवसा आणि रात्री तसेच सर्व हवामान परिस्थितीत अचूकपणे लक्ष्य करण्यास ही प्रणाली सक्षम आहे. 1400 हॉर्सपावरचे एमटीयू डिझेल इंजिन अर्जुनला 70 किमी वेगाने नेतो.
