AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक थेंब पाणी मिळणार नाही, पाकिस्ताननंतर बांगलादेश रडकुंडीला, भारताने थेट..

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कायमच तणावात राहिले आहेत. त्यातच आता बांगलादेशानेही भारतासोबत पंगा घेतला. ज्याची किंमत बांगलादेशला मोजावी लागणार आहे. पाण्याच्या एका थेंबासाठीही त्यांना तरसावे लागणार आहे.

एक थेंब पाणी मिळणार नाही, पाकिस्ताननंतर बांगलादेश रडकुंडीला, भारताने थेट..
Indus Water Treaty
| Updated on: Sep 20, 2026 | 8:30 AM
Share

पाकिस्तान आणि बांगलादेश पाण्यासाठी भारताकडे भीक मागत आहेत. दोन्ही देशांना भारताविरोधात मागून काड्या करायच्या आहेत. पण दुसरीकडे भारताने त्यांच्या जनतेचा विचार करून त्यांना पाणी दिले पाहिजे, असे मत त्यांचे आहे. हेच नाही तर भारताविरोधात पाकिस्तान थेट जागतिक न्यायालयात गेला आहे. भारताने पहलगाम हल्ल्यानंतर सिंधू जल करार स्थगित केला. ज्यानंतर पाकिस्तानला भीकेला लागण्याची वेळ आली. सिंधू जल करार भारताने स्थगित केल्याने पाकिस्तानात स्थिती गंभीर आहे. शेतीच्या पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न आहे. बांगलादेशलाही भारतासोबत जल करार करायचा आहे, पण भारतासोबत पंगेही घ्यायची आहेत. गंगा नदीवर भारत आणि बांग्लादेश यांच्यात करार झाला आहे, जो करार आता संपणार आहे. 12 सप्टेंबर 1996 रोजी या करारावर सह्या झाल्या होत्या.

हा करार 2026 मध्ये संपणार आहे. बिहारकडून या कराराला विरोध केला जात आहे. मात्र, बांगलादेश या करारासाठी आग्रही आहे. हा करार झाला नाही तर बांगलादेशात भीषण पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध तणावात आहेत. भारतात आयोजित करण्यात आलेल्या ब्रिक्स परिषदेकडे बांगलादेशच्या पंतप्रधानांनी पाठ फिरवली.

त्यात आता त्यांना भारतासोबत जल करार करायचा आहे. गंगानदीवरील जल करारासाठी बांगलादेश आग्रही आहे. मात्र, भारताविरोधात भूमिका बांगलादेशाकडून घेतली जात आहे. शेख हसीना भारतात असल्यापासून दोन्ही देशांचे संबंध पूर्वीसारखे राहिले नाहीत. त्यातच बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात जवळीकता वाढत आहे. भारताने पाकिस्तानला लाईनवर आणण्यासाठी मोठा निर्णय घेतला.

पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नसल्याची भूमिका भारताची आहे. भारतावर पाण्यासाठी मोठा दबाब पाकिस्तानकडून टाकला जात आहे. विविध प्रकारच्या धमक्याही पाकिस्तानकडून भारताला दिल्या जात आहेत. असे असले तरीही भारत आपल्या भूमिकेवर ठाम आहे. पाकिस्तानच्या अनेक मंत्र्यांनीही चिंता व्यक्त केली. पाकिस्तान जागतिक न्यायालयात भारताविरोधात गेला आहे. तिथे सुनावणी सुरू आहे. मात्र, भारताने आम्ही याला मानत नसल्याचे जाहीर केले.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी