
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावूनही त्याचा परिणाम हा भारतावर पडला नसल्याचे स्पष्ट होतंय. उलट अमेरिकेचेच मोठे नुकसान झालंय. अमेरिकेतील बाजारात वस्तूंच्या किंमतीत मोठी वाढ झाली असून मोठा फटका बसला. आता भारतासाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी येताना दिसतंय. अमेरिकेने 50 टक्के टॅरिफ लावूनही ऑगस्ट महिन्यात भारतातील निर्यात वाढली आहे. दुसऱ्या महिन्यात ही निर्यात वाढल्याचे रिपोर्टमध्ये स्पष्ट होतंय. हेच नाही तर भारताचा व्यापारातील तोटाही कमी झाला आहे.
सरकारकडून ही आकडेवारी जाहीर करण्यात आलीये. ऑगस्ट महिन्यात भारताचा व्यापारातील तोटा कमी होऊन 26.49 अरब डॉलर झाला. जुलै महिन्यात मागील आठ महिन्यातील 27.35 अरब डॉलर होता अर्थतज्ज्ञांनी ऑगस्ट महिन्यात 24.8 अरब डॉलरचा तोटा भारताला होईल असा अंदाज वर्तवला होता. ऑगस्ट महिन्यात भारतातील आयात 10.1 टक्के कमी होऊन 61.59 अरब डॉलरपर्यंत आली तर निर्यात 6.7 टक्के वाढून 35.1 अरब डॉलर झाली.
विशेष म्हणजे हे आकडे ज्यावेळीचे आहेत, जेव्हा अमेरिकेने भारतावर 7 ऑगस्टला 25 टक्के टॅरिफ हा लावला होता. अवघ्या वीस दिवसांच्या अंतराने त्यांनी भारतावर एकून 50 टक्के टॅरिफ लावला. असे सांगितले जाते की, अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर भारताला फार काही परिणाम झाला नाही. एप्रिल ते ऑगस्टदरम्यान भारतातून अमेरिकेत 40.39 अरब डॉलरची निर्यात झाली. भारत हा अमेरिकेचा सर्वात मोठा निर्णयादार आहे. मात्र, आता 50 टक्के टॅरिफमुळे निर्यातीवर परिणाम झालाय. याचा फटका भारतापेक्षा अमेरिकेला अधिक बसताना दिसतोय.
अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतर अनेक देश हे भारताच्या मदतीला धावून आली. रशियाने भारताला पाठिंबा देत म्हटले की, आम्ही आमच्या बाजारपेठेत भारतीय वस्तूंचे मोठ्या संख्येने स्वागत करू. यासोबतच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जपानच्या दाैऱ्यावर देखील गेले. भारताने अमेरिकेला स्पष्ट सांगितले की, आमच्याकडून वस्तू खरेदी करायच्या नसतील तर नका करू. मात्र, भारताने अमेरिकेच्या अटी मान्य न करता रशियाकडून तेल खरेदी ही सुरूच ठेवली.